25.6 C
Kolhāpur
Homeआरोग्यमहाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना दिवाळीपूर्वी सर्व थकित मानधन व...

महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना दिवाळीपूर्वी सर्व थकित मानधन व मोबदला देणार -आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे

महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना दिवाळीपूर्वी एप्रिल 2021 पासून सर्व थकित मानधन व मोबदला देण्यात येईल असे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे शिष्टमंडळास आश्वासन*! तारीख सहा ऑक्टोबर रोजी  दुपारी एक वाजता महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक महिला संघटना संयुक्त कृती समिती व आरोग्य विभागाचे सचिव व अधिकारी यांची संयुक्त बैठक श्री राजेश टोपे यांनी मुंबईमध्ये घेतली. या बैठकीमध्ये खालील विषयांची चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. एप्रिल 2021 पासून आशा महिलांचे दोन हजार रुपये वाढीव मानधन व गटप्रवर्तक महिलांचे तीन हजार रुपये वाढीव मानधन सप्टेंबर 2021 पर्यंत दिले जाईल. तसेच जुलै दोन हजार बावीस पासून आशा व  व गटप्रवर्तक महिलांच्या मानधनातील बाराशे रुपये ची वाढ तसेच covid-19 प्रोसहान भत्ता वाढ देण्यात येईल. नऊ सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआर मध्ये मुद्दा क्रमांक 4 नुसार जुलै दोन हजार बावीस पासून आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मानधना मध्ये पाचशे रुपये वाढ देण्याचा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय कायम असून त्याबाबत आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांनी शिष्टमंडळास दिले.महाराष्ट्रातील सर्व हॉस्पिटलमध्ये आशांच्या साठी सुरक्षा कक्ष सुरू करण्याबाबत तातडीने व्यवस्था करण्यात येईल असे सांगण्यात आले.Kovid महामारी संपल्यानंतर kovid भत्ता जरी बंद झाला तरी 23 जून रोजी ठरल्यानुसार पाचशे रुपये मानधन वाढ एक जुलै 2022 पासून देण्यात येईल.1 जानेवारी 2022 पूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना अँड्रॉइड मोबाईल देण्यात येईल. आशा व गटप्रवर्तक महिलांना आवश्यक चार बाबींची कामे करून सुद्धा 2000 अपेक्षा कमी रक्कम मिळालेले असल्यास त्यांना उर्वरित रक्कम  फरक देण्यात येईल. त्याबाबतची माहिती संघटनेने शासनाकडे द्यावी असे आरोग्य मंत्री यांनी सांगितले. याशिवाय खालील मुद्द्यांच्या बद्दलची चर्चा झाली. आशा व गटप्रवर्तक महिलांनी एन एम एन व जे एन एम चा कोर्स पूर्ण केलेला असेल त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये ए एन एम  पदावर घेण्यात येईल. त्यासाठी कोर्स करणाऱ्या महिलांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या शिफारशीनुसार नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असला पाहिजे असे बंधन आहे  असे सचिवांनी सांगितले.  याबाबत संघटनेने अशी मागणी केलेली आहे की, आशा व गटप्रवर्तक महिलांनी  कोर्स पूर्ण केलेला असेल त्यांची सर्वांची एन एम व जे एन एम पदावर कायमपणे नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली. आशा व गटप्रवर्तक महिलांना सायकल मिळाली पाहिजे. सर्वांना वेतन चिट्टी मिळणे आवश्यक आहे. आरोग्य वर्धनी चे काम ज्या आशानी केले असेल त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. आरोग्यवर्धिनी च्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तक महीलांना करावे लागत असल्यामुळे त्यांना दरमहा पंधराशे रुपये जादा मोबदला देण्यात यावा. ज्या ठिकाणी CHO नेमणूक केली नसेल अशा ठिकाणी   मेडिकल ऑफिस मार्फत आरोग्यवर्धिनी चे काम करून आशा व गटप्रवर्तक महिलांना मोबदला देण्यात यावा. ज्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर 2021 पर्यंत अष्टोत्तर पैकी केलेल्या कामाचा मोबदला दिलेला नसेल त्यांना तो ताबडतोब द्यावा. यासाठी संयुक्त कृती समितीने ज्या जिल्ह्यांची नावे सांगितले आहे त्या ठिकाणी DHO कडून विचारणा करण्यात येईल व त्यांना थकित रक्कम मिळेल असे आश्‍वासन देण्यात आले. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत त्या सर्व कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तक महिलांना करावे लागत असल्यामुळे त्यासाठी प्रत्येक केसला 250 रुपये गटप्रवर्तक महिलांना मोबदला मिळाला पाहिजेआशा सॉफ्टवेअर जरी बंद असले तरी गटप्रवर्तक महिलांना काम करावे लागत असल्यामुळे त्या कामाचा मोबदला मिळाला. अशा मागण्या करण्यात आल्या. यानंतर उपस्थित समीतीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन असा निर्णय घेण्यात आला की,25 ऑक्टो. पर्यंत शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यास संपुर्ण महाराष्ट्रात आशा व गट प्रवर्तक महिला तीव्र आंदोलन करतील. असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. शिष्टमंडळाला मध्ये कॉ एम् ए पाटील, कॉ शंकर पुजारी, कॉ आरमयटी, कॉ श्रीमंत घोडके, कॉ राजेंद्र साठे, कॉ राजेश सिंग, प्रिती मेश्राम इत्यादींचा समावेश होता.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा