25.6 C
Kolhāpur
Homeक्रीडामलकापूर येथे दिव्यांगासाठी टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मलकापूर येथे दिव्यांगासाठी टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मलकापूर- दिपक इटणारे

दि.7-10-2021 महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी दिव्यांग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या वतीने मलकापूर येथे दिनांक 9 व 10 ऑक्टोबर रोजी टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेत विदर्भ मुंबई व उर्वरित महाराष्ट्राचा संघ सहभागी होत असून राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा खेळ मलकापूर येथे रंगणार आहे. स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या टर्फ विकेटवर वर पहिल्यांदाच राज्यस्तर दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे .या स्पर्धेची जय्यत तयारी मलकापूर येथे सुरू असून बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील खेळाडू नागेश इंगळे यांची विदर्भाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून चिखली येथील हनुमान शिंदे हा मध्यमगती गोलंदाज विदर्भा कडून या स्पर्धेत खेळणार आहे. याशिवाय अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर तसेच मुंबई नवी मुंबई पालघर नाशिक धुळे जळगाव खानदेश सातारा कोल्हापूर येथील खेळाडू देखील सहभागी होत आहेत .त्याचप्रमाणे गतवर्षी दिव्यांग चषक वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेले तथा भारतीय संघाकडून खेळलेले अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेची जबाबदारी दिव्यांग क्रिकेट असोसिएशन बुलढाणा अध्यक्ष गणेश जाधव त्याचप्रमाणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत साळुंके क्रीडा मार्गदर्शक राजेश भोसले व स्वप्नील साळुंके आणि छत्रपती शिवाजी क्रिकेट अकॅडमी चे सर्व सदस्य स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा