28.3 C
Kolhāpur
Homeआरोग्यजीवनधारा ब्लड बँक सह 50 हुन अधिक वेळा रक्तदान करणारे पघाकर कापसे...

जीवनधारा ब्लड बँक सह 50 हुन अधिक वेळा रक्तदान करणारे पघाकर कापसे – अनिता काळे चा लायन्स क्लब ( वेस्ट ) वतीने गौरव

जीवनधारा ब्लड बँक सह 50 हुन अधिक वेळा रक्तदान करणारे पघाकर कापसे – अनिता काळे चा लायन्स क्लब ( वेस्ट ) वतीने गौरव
कोल्हापूर – प्रतिनिधी – लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट वतीने सेवा सप्ताह अंतर्गत स्वेच्छा रक्तदान दिवसाचे औचित्य साधून जीवनात विक्रमी रक्तदान करणारे पघा कर कापसे – अनिता काळे यांचेसह राष्ट्रीय मानांकीत जीवनधाराब्लड बँक चे प्रकाश घुंगुरुकर आदि चा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान लायन्स अध्यक्ष मोहन हजारे यांचे हस्ते गौरव करण्यात आला . यावेळी हजारे नी स्वतःही रक्तदान केले .
प्रख्यात डॉ संदीप पाटील यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना आजच्या सत्कार मुर्ती श्रीमती अनिता काळे यांनी 65 वेळां रक्तदान केले तर ए — निगेटिव्ह हा दुर्मिळ रक्त गटांतील रक्तदान 55 वेळा केलेले समाजसेवी पदमाकर कापसे यांना तर प्रकाश घुंगुरकर यांनीही 50 हुन अधिकवेळा रक्तदान करत जीवनधारा ब्लडबँकेस पश्चिम महाराष्ट्रात लौकीक मिळवून दिला आहे , त्याबद्दल या तिघांना पुरस्कार देऊन सन्मानित होणे हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे यांचा आदर्श परिपाठ आहे ‘ असे नमूद केले . तर वर्षातून एकदा तरी रक्तदान केलेस नक्कीच किमान चार व्यक्तीना जीवनदानाचे पुण्य लाभेल , तरी सर्वानी रक्तदान करून यांची अनुभूती घ्यावी असे मत पघाकर कापसे यांनी सत्कारमुती वतीने व्यक्त केले तर आगामी काळात ब्लड बॅक संघटना – जीवनधारा – लायन्स वतीने रक्तदान विषयी भव्य परिसंवाद घेण्याचा मनोदय समन्वयक राजेंद्र मकोटे यांनी व्यक्त केला . यावेळी भाजपा चे पदवीधर मित्र चे माणिक पाटील चुयेकर सह नंदकुमार मराठे , यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या .यावेळी लायन्स सचिव योगेश सांळुखे , तुषार भिवटे ‘ चंद्रकात नार्वेकर , अनिल बेलेकर , श्री राम भुरळे आदी उपस्थित होते .

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा