25.6 C
Kolhāpur
Homeक्रीडाअखेर मुंबईला विजयी सूर गवसला, ईशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानवर दणदणीत...

अखेर मुंबईला विजयी सूर गवसला, ईशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानवर दणदणीत विजय

आयपीएलच्या आज मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान राॅयल्सचा 8 गडी राखत दणदणीत विजय मिळवला.

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट गमावत केवळ 90 धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर एविन लुईसने सर्वाधिक 24 धावा केल्या. तर मुंबईकडून नॅथन कुल्टर नाईलने 4, तर या हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या जेम्स निशमने 3, तर जसप्रित बुमराने 2 विकेट घेतल्या.

धावांचा पाठलाग करताना मुंबईने हे लक्ष्य केवळ 8.2 षटकात 2 विकेट गमावत पूर्ण केलं. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 13 चेंडूत 22 धावा केल्या. सलामीवीर ईशान किशनने 25 चेंडूत नाबाद 50 धावांची विस्फोटक खेळी केली. तर सुर्यकुमार यादवने 8 चेंडूत 13 धावांची खेळी केली. तर राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमान व चेतन साकरियाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा