28.3 C
Kolhāpur
Homeक्राइमबापाच्या केंद्रीय मंत्रीपदाचा माज,रस्त्याच्या कडेला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले; उत्तर प्रदेशातील लखीमपूर...

बापाच्या केंद्रीय मंत्रीपदाचा माज,रस्त्याच्या कडेला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले; उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील घटना, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू तर दहा जखमी

उत्तर प्रदेशातील लखिमपूर खेरी जिल्ह्यातील तिंकूनिया या गावात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडी घातल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यु झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून उत्तर प्रदेशाचे एडीजी प्रशांत कुमार यांना तातडीने तेथे पाठविण्यात आले आहे.

याबाबत संयुक्त किसान मोर्चाने सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी हे सर्व शेतकरी गेली काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या गावात उपमुख्यमंत्री येणार असल्याचे समजल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे सर्वजण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काळे झेंडे घेऊन उभे होते. हे गाव केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांचे मूळ गाव असल्याचे सांगण्यात येते.

शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री उतरल्यानंतर त्यांना तेथे घेराव घातला. त्यानंतर ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्यांना काळे झेंडे दाखवित होते. त्याच वेळी अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याने त्याची व त्याच्या नातेवाइकांच्या दोन अशा तीन गाड्या भरधाव वेगाने आंदोलनकर्त्यांच्या अंगावर घातल्या. यामध्ये एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाला. तर आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यु झाला. याशिवाय आणखी दहा जण जखमी झाले असून त्यातील काहींची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले जाते. जखमी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संयुक्त किसान मोर्चाचे नेते तेंजिंदर एस विर्क यांचाही समावेश आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती समजल्यानंतर संयुक्त किसाम मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे. शेतकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा