25.6 C
Kolhāpur
Homeक्राइमरत्नागिरी : रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

रत्नागिरी : रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

रत्नागिरी : रानडुक्करांच्या सुळ्यांची तस्करी करताना रंगेहाथ पकडलेल्या 2 आरोपीना गुहागर पोलीस व वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी अटक केली असून जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे 20 इंच लांबीचे रानडुकरांचे 6 सुळे (दात) पोलीसांनी जप्त केले आहेत.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रानडुकराच्या सुळ्यांचा खरेदी विक्री व्यवहार पूर्ण करायला दोन व्यक्ती येणाऱ्या असलीची गुप्त माहिती पोलीसांपर्यत पोचली होती. त्यामुळे गुहागर पोलीसांनी वेळणेश्र्वर समुद्रकिनाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी दोन व्यक्ती वेळणेश्र्वर समुद्रकिनाऱ्यावर आल्या. त्यांच्या हालचाली पाहून पोलीसांचा संशय बळावला. त्यांची चौकशी करुन अंगझडती घेतली. तेव्हा 3 रानडुकरांचे 20 इंच लांबीचे 6 सुळे पोलीसांना मिळाले. या संदर्भातील वनखात्याचा कोणताही परवाना त्यांच्याकडे सापडला नाही. त्यामुळे पोलीसांनी या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. दिलीप महादेव बिर्जे (वय 51, रा. साखरीआगर) आणि प्रणव विलास गडदे (वय 38, रा. हेदवी) अशी या दोघांची नावे आहेत.

सदर सुळे हे पिशाच्च बाधा घालविण्यासाठी व गुप्तधनाच्या शोधासाठी वापरले जातात असे सांगितले जाते. त्यामुळे बाजारात या सुळ्यांना मोठी किंमत मिळते. त्यामुळे रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करीही केली जाते, असे चौकशीत समोर आले आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा