25.6 C
Kolhāpur
Homeआरोग्यबुलडाणा शहरात दोन अतिरिक्त कोविड लसीकरण सत्रास सुरूवात

बुलडाणा शहरात दोन अतिरिक्त कोविड लसीकरण सत्रास सुरूवात

बुलडाणा शहरात दोन अतिरिक्त कोविड लसीकरण सत्रास सुरूवात

बुलडाणा/जिल्हा प्रतिनिधी- दिपक इटणारे

दि.3: बुलडाणा शहरामध्ये अतिरिक्त कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य प्रशासन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने तहसिलदार रूपेश खंडारे यांच्या दालनात याबाबत विशेष बैठक 1 ऑक्टोंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीत शहरातील लसीकरणाबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला. या कृती आराखड्यामध्ये संपूर्ण आरोग्य सत्राचे नियोजन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आल आहे. यासाठी नगर पालिका प्रशासन त्यांच्या स्तरावरून जनजागृती करणार आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना प्रेरीत करून लसीकरणासाठी घेवून येणार आहेत. शहरातील शिक्षक लाभार्थ्यांची संगणकीय नोंदणी करणार असून पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहणार आहे. या लसीकरण सत्राला 1 ऑक्टोंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, उपमुख्याधिकारी श्रीकांत पवार, लसीकरण सनियंत्रक दिपक महाले, स्वास्थ्य अभ्यांगता श्रीमती पुजा जाधव, आरोग्य सेविका श्रीमती वंदना मुळे, डॉ. माहूरकर, विशाल काळवाघे यांचे उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. नगरपालिका परीसर व एकता नगर येथील बालक मंदीरात सोमवार ते शुक्रवार लसीकरण सत्र सुरू राहणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी व नगर पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा