28.3 C
Kolhāpur
Homeदेश-विदेशम्हशीनं घेतला बलाढ्य गेंड्याशी पंगा, पुढे काय झालं व्हिडीओ

म्हशीनं घेतला बलाढ्य गेंड्याशी पंगा, पुढे काय झालं व्हिडीओ

मुंबई: बऱ्याचदा प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी म्हशीचा एक व्हिडीओ सिंहिणींसोबतच व्हायरल झाला होता. आता म्हशीनं तर थेट बलाढ्य गेंड्याशीच पंगा घेतला आहे. सर्व प्राणी शांत असताना आपला कळप सोडून एक म्हैस चक्क गेंड्याशी लढाई करण्यासाठी आली. तिला काय वाटलं माहिती नाही मात्र तिने थेट या बलाढ्य गेंड्याशी पंगा घेतला. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की म्हैस या गेंड्याला एकदा नाही तर अनेकवेळा आपल्या शिंगाने उसकवण्याचा प्रयत्न करत आहे. गेंडा सहसा चिडत नाही विनाकारण कोणाशी लढाई करायला जात नाही. अगदी सुरुवातीला शांत असणारा हा गेंडा एकदम चिडतो आणि मग लढाई सुरू होते. 

म्हशीला एक दोनदा पाहून घेतो आणि नंतर मात्र आपल्या ताकदीने एकच फाईट देतो की म्हैस चक्क हवेत उडून खाली कोसळते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे. ही घटना रिझर्व्ह दक्षिण आफ्रिकेतील असल्याची चर्चा आहे. Braden colling यांनी हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेंड्याचा एकच वार म्हशीसाठी पुरेसा ठरतो. तो लढण्यासाठी आलेल्या म्हशीला एकच फाईट देतो की म्हैस थेट हवेत उडून खाली कोसळते. या व्हिडीओला सोशल मीडियावर लोकांनी लाईक केलं आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे. 

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा