25.6 C
Kolhāpur
Homeआरोग्यजिल्ह्यात 108 रुग्णवाहिकांचा वापर चुकीच्या पद्धतीने; संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्याची जि.प. अध्यक्षांची...

जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकांचा वापर चुकीच्या पद्धतीने; संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्याची जि.प. अध्यक्षांची सूचना

रत्नागिरी : शासनाकडून दिलेल्या 108 रुग्णवाहिकांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. संबंधित व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी सुचना स्थायी समितीच्या बैठकी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपाध्यक्ष उदय बने यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड उपस्थित होत्या. रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु चुकीच्या पध्दतीने नियोजन होत असल्यामुळे गरजेच्या वेळी रुग्णांना त्या वेळेत उपलब्ध होत नाही. हा प्रकार सदस्यांच्या लक्षात आला होता. त्यावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. हे नियोजन करणाऱ्या व्यवस्थापकांवर संबंधित विभागाने कारवाई करावी अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहेत. कोविड कालावधीमध्ये 108 रुग्णवाहिकांसाठी मागणी करणाऱ्या बाधितांच्या नातेवाईकांना उलटसुलट उत्तरे मिळत होती. आधी बेड कन्फर्म करा, नंतर तुम्हाला नेण्याची व्यवस्था केली जाईल असे उत्तर संबंधितांकडून देण्यात आले होते. हा मुद्दा उदय बने यांनी उपस्थित केला होता. तसेच आजारी रुग्णाला दापोलीतून चिपळूणात आणत असताना रिक्षा बंद पडली. त्यावेळी 108 रुग्णवाहिकेसाठी दुरध्वनी करण्यात आला. तेव्हा मदत करण्याऐवजी अशाप्रकारे रुग्ण नेण्यासाठी ही सेवा नसल्याचे उत्तर मिळाले. याबाबत रुग्णवाहिका व्यवस्थापन करणाऱ्यांना सदस्य संतोष थेराडे यांनी दुरध्वनी केला असता बंद होता. त्यामुळे रुग्णाला गरज असताना सेवा मिळू शकली नाही. यावर सदस्यांनी तिव्र नाराजी व्यक्त करत व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी केली.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा