25.6 C
Kolhāpur
Homeपुणे'बार्टी’त नागरी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

‘बार्टी’त नागरी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

नागरी सेवा परीक्षेत अनुसूचित जातीचा टक्का वाढावा म्हणून बार्टी, येरवडा येथे यूपीएससी निवासी प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करणार असल्याचे तसेच यूपीएससी 2020 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

पुणे येथील बार्टी च्या सभागृहामध्ये बार्टीच्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

उपायुक्त पुणे मुकुल कुलकर्णी (IRS), व उपायुक्त रुपेश शेवाळे (IRS) हे उपस्थित होते. यूपीएससी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शरण कांबळे (AIR 542) व श्री अजिंक्य विद्यागर (AIR 617)यांचा सत्कार बार्टीचे महासंचालक श्री.गजभिये यांच्या हस्ते करण्यात आला.

महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले, कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी कष्टाची पराकाष्ठा करून मेहनत घेतली, यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020यश मिळविले, या यशानंतर तुमच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. या संविधानाची अंमलबजावणी करून महामानवाचा विचार पुढे न्यावा, असे श्री.गजभिये यांनी सांगितले.

मुलाखतीच्या पूर्वतयारी प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकाऱ्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे तीन मॉक इंटरव्ह्यू घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्याद्वारे एकमेकांची मुलाखत घेतली व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पॅनलद्वारे मुलाखत घेण्यात आली. दि. 10 मे 2021 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आयुक्त, प्रशांत नारनवरे यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानातून पूर्वतयारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. मुकुल कुलकर्णी व रुपेश शेवाळे यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा तयार केली होती. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत उमेदवारांनी बार्टी संस्थेचे आभार मानले. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सुहास गाडे, स्वप्नील निसर्गन, पियुष मडके हे यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ऑनलाइन उपस्थित राहिले. IRS रुपेश शेवाळे, व IRS मुकुंद कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यास बार्टीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती प्रिया पवार, प्रकल्प अधिकारी यांनी केले. श्री उमेश सोनवणे, विभाग प्रमुख, योजना विभाग, बार्टी, यांनी आभार मानले

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा