25.6 C
Kolhāpur
Homeपुणेमनसेचं अखेर ठरलं, भाजप-मनसेत पहिली युती जाहीर, या जिल्ह्यात होणार युती

मनसेचं अखेर ठरलं, भाजप-मनसेत पहिली युती जाहीर, या जिल्ह्यात होणार युती

भाजप- मनसे युतीचा श्री गणेशा पालघर जिल्ह्यामध्ये झाला आहे. भाजपशी युती केल्यास सत्तेत येऊ त्याने मनसेला फायदाच होईल अशी मागणी मनसैनिकांकडून करण्यात येत होती. तर भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चा या मागील २ ते ३ महिन्यांपासून सुरु होत्या अखेर भाजप-मनसेची युती झाली आहे. पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालघरमध्ये पोटनिवडणुकीसाठी मनसे भाजप एकत्र आले असल्याची माहिती दिली आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपशी युती करावी असा आग्रह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धरला आहे. मनसैनिकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर भाजप-मनसेमध्ये युती झाली आहे. आता भाजप-मनसेची युती महाविकास आघाडीला टक्कर देईल तर पुण्यात मनसे-भाजपशी हातमिळवणी करणार का हे पाहावं लागेल.

मनसेनं पालघर जिल्ह्यात पोटनिवडणूक लढवण्यासाठी भाजपशी युती केली आहे. पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होऊ घातली आहे. पालघरमधील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसेमध्ये युती झाली आहे. या युतीची माहिती मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली असून भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे. भाजपने हात पुढे केला तर मनसेही हात पुढे करेल आणि भाजपशी युती केल्यास मनसेला फायदा होईल असे वक्तव्य पुण्याते मनसे नेते वसंत मोरे यांनी केलं आहे.

पुण्यातही भाजपशी युती करण्याची मागणी
पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेने सर्व राजकीय पक्षांच्या आधीच सुरुवात केली आहे. पुण्यात सत्ता आणण्यासाठी मनसेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या सभेनंतर मात्र मनसे नेत्यांकडून भाजपी युती करण्याचा सूर उमटत आहे. आगामी निवडणुकीत मनसेने भाजपशी युती करावी, भाजपशी युती केल्यास मनसेला फायदा होईल असे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पुणे दौरा करत असून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभाग रचना बदलण्याची शक्यता असल्यामुळे चाचपणी सुरु केली आहे. यादरम्यान मनसैनिकांनी युतीची मागणी केल्यामुळे राज ठाकरेंचे भूमिका काय आहे? हे पाहावं लागणार आहे.

९० जागांवर लक्षकेंद्रित
पुण्यात महानगरपालिकेत मनसे सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. यामध्ये १६४ पैकी ९० जागांवर मनसे लक्षकेंद्रित करणार आहे. महानगरपालिका २०२२ मध्ये पुण्यात ४५ जागांवर निवडून येतील असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत मनसेचे नगरसेवक कमी झाले. पुण्यातील प्रभाग रचनेमुळे नगरसेवक कमी झाले असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु पुण्यात मनसेचा प्रभाव कमी झाल्याचे दिसत आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा