25.6 C
Kolhāpur
Homeमनोरंजनएमी अवॉर्ड्स' नामांकनाबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीला कंगनाने दिल्या शुभेच्छा

एमी अवॉर्ड्स’ नामांकनाबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीला कंगनाने दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले जाते. अशातच जगातील सर्वात प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला नामांकन जाहीर झाले आहे. नवाजला मिळालेल्या नामांकनासाठी सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. विशेष म्हणजे अभिनेत्री कंगना रनौत हीने देखील नवाजुद्दीन सिद्दीकाला शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत, अभिनंदन सर, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. असा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टसह तिने पृथ्वी इमोजी देखील दिला आहे.

‘तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक’, एमी अवॉर्ड्स’ नामांकनाबद्दल नवाजुद्दीनला कंगनाने दिल्या शुभेच्छा
Sushma Rane
Updated: September 25, 2021 6:12 PM

‘तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक’, एमी अवॉर्ड्स’ नामांकनाबद्दल नवाजुद्दीनला कंगनाने दिल्या शुभेच्छा
‘एमी अवॉर्ड्स’ नामांकनाबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीला कंगनाने दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले जाते. अशातच जगातील सर्वात प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला नामांकन जाहीर झाले आहे. नवाजला मिळालेल्या नामांकनासाठी सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. विशेष म्हणजे अभिनेत्री कंगना रनौत हीने देखील नवाजुद्दीन सिद्दीकाला शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत, अभिनंदन सर, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. असा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टसह तिने पृथ्वी इमोजी देखील दिला आहे.

नेटफ्लिक्सवरील सिरियस मॅन या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले आहे. या नामांकनात नाव जाहीर होताच सोशल मीडियावर आता कंगनापाठोपाठ अनेक कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. यानंतर नवाजने देखील सोशल मीडिया पोस्ट शेअर करत एमी पुरस्कारात नामांकित केल्याबद्दल आभार व्यक्त केले होते. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘व्व!!! सिरियस मॅन चित्रपटासाठी मला एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. दिग्दर्शक सुधीर मिशरा आणि ‘सिरियस मॅन’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.’

याशिवाय नवाजुद्दीनने एक निवेदन जाहीर केले. यात नवाज म्हणाला होता की, सुधीरसोबत ‘सिरियस मॅन’मध्ये अय्यन मणीची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी एक स्वप्न साकारण्यासारखे होते. आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळणे म्हणजे चित्रपटासाठी केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. मी नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे आभार मानतो, जे जागतिक स्तरावर ओळखले जात आहेत.”७१ व्या एमी पुरस्कार विजेत्यांची यादी २२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा