25.6 C
Kolhāpur
Homeमनोरंजनकियारा आणि सिद्धार्थ लवकरचं चढणार बोहल्यावर?

कियारा आणि सिद्धार्थ लवकरचं चढणार बोहल्यावर?

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बी-टाऊनमध्ये चर्चा रंगत आहेत. दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत. यात ‘शेहशाह’ रिलीज झाल्यानंतर या लव्हबर्ड जोडीला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत आनंदाची बातमी ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘शेरशाह’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे. तर कियारा आडवाणी कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रियसी डिंपल चीमाची भूमिकेत झळकली. मात्र चित्रपटापूर्तीच दोघे प्रिय-प्रियसीच्या भूमिकेत नसून ते रिअल लाईफमध्येही रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थ कधी बोहल्यावर चढणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

या रिलेशनशिपवर सिद्धार्थने आता मौन सोडले आहे. लग्न कधी होईल हे सांगायला मी ज्योतिषी नाही. कोणाबरोबर होईल हे देखील माहित नाही. मात्र जेव्हा होईल तेव्ह नक्की सांगेन, असं तो म्हणाला. यावेळी कियारा अडवाणीचेही त्याने खूप कौतुक केले.

ऑफ स्क्रीन ती खूप वेगळी असते, ती फिल्म अॅक्ट्रेस आहे हे ऐरवी कोणाला सांगून पटणार नाही. कारण ती अगदी साधी आणि नॉर्मल असते. तिचा हा गुण मला खूप आवडतो. असे सिद्धार्थने सांगितले. तसेच कियाराबरोबर आणखी एक लव्हस्टोरी फिल्म करायची इच्छा त्याने व्यक्त केली.

Must Read
Related News
error: Content is protected !!
Open chat
1
नमस्ते 🙏
आमच्या व्हॉट्सअॅप न्यूज लेटरमध्ये तुम्हाला जोडण्यासाठी Hi पाठवा