महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीच्या थराराणे यवत यात्रेची सांगता.. बाला रफिक सागर बिराजदार यांची अंतिम कुस्ती लढत,एक लाख पंचवीस हजाराचे बक्षीस.


यवत (दि.२५) वार्ताहर

दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेची नेत्रदिपक कुस्त्यांचा आनंद घेत कुस्तीचा आखाडा पार पडला.यावेळी बहुतांश कुस्त्या चितपट झाल्या असल्या तरी २०१८ सालचा महाराष्ट्र केसरी बाला शेख व उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार यांच्या कुस्तीने यवतकरांनी महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवला.माघ पौर्णिमेनिमित्त श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेनिमित्त यवत येथे दरवर्षी जंगी आखाडा भरतो.पुणे, कोल्हापूर येथे तालीम करणाऱ्या स्थानिक मल्लांसोबतच पंजाब,हरीयाणा यासारख्या परप्रांतासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून अनेक मल्यांनी यावेळी कुस्ती आखाड्यामध्ये सहभाग घेतला होता.

स्थानिक मल्ल राष्ट्रीय खेळाडू मंगेश दोरगे व संतोष नरुटे यांच्यात झालेल्या चितपट कुस्त्यांनी यवतच्या आखाड्याला मोठी रंगत आली.यवत येथे समाधानकारक इनाम मिळत असल्याने येथे मल्लांची मोठी गर्दी झाली होती. शेवटच्या कुस्तीचे इनाम हे या आखाड्याचे एक वैशिष्ट आहे.
दरवर्षी वाढणारा हा आकडा या वर्षी मात्र कमी होऊन १ लाख २५ हजार रूपयांवर गेला होता.सायंकाळी ५ वाजता सुरू झालेला आखाड्याची सांगता रात्री ०८ वाजता झाली.सुरुवातीला परिसरातील लहान मल्ल्यांपासून प्रारंभ झालेला कुस्त्यांचा आखाडा अखेर महाराष्ट्र केसरीपर्यंत च्या सर्व कुस्त्या यवतकरांनी अनुभवल्या.अखेरच्या मानाच्या ८ कुस्त्यांमध्ये
शेवटच्या ८ कुस्त्यांमध्ये ८ वी कुस्ती सोमनाथ डोंबाळे विरूद्ध दादा गजगुडे यांच्यात चितपट झाली तर ७ वी कुस्ती महादेव बागडे विरुध्द विराज सावंत यांच्यात होती परंतु ऐनवेळी मल्ल बदली झाल्याने कुस्ती झाली नाही यानंतर अनुक्रमे कुमार माने – युवराज कदम ,अक्षय कामठे – यश इनामके , रोहित जवळकर – राहुल दिवेकर, उपहिंद केशरी तुषार डुबे – अक्षय गरुड यांच्या कुस्त्या बरोबरीत पार पडल्या.गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी झालेल्या मंगेश दोरगे – संतोष नरुटे (५२ हजार ) यांची चितपट कुस्तीत मंगेश दोरगे याने बाजी मारली.यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू मनीषा दिवेकर व हर्षदा वरुडकर यांचा सन्मान करण्यात आला.

Advertisement

तर २०१८ चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख – उपमहाराष्ट्र केसरी सागर बिराजदार यांच्यात १ लाख २५ हजार रुपये रुपयांसाठी अंतिम लढत झाली गेल्या वर्षी १ लाख ५१ हजार रुपयांसाठी झालेली कुस्ती यावर्षी २६ हजारांनी कमी झालीमानाच्या कुस्तीगटातील काही कुस्ती बरोबरीत सुटली असल्या तरी आखाड्यात गाळलेला घाम आणि त्यांनी केलेल्या डाव प्रतिडावाने लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

कुस्ती समालोचक किसन काळे यांच्या समालोचनामुळे परिसरातील वातावरण कुस्तीमय झाल्याने नागरिकांनी कुस्तीचा खरा आनंद अनुभवला कुस्ती आखाड्यासाठी पंच म्हणून यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदानंद दोरगे, सतीश दोरगे, शंकर दोरगे, संजय दोरगे, दिलीप दोरगे यांनी काम पाहिले. यवत येथे होणाऱ्या शेवटच्या कुस्त्या या मानाच्या कुस्त्या म्हणून संबोधले जाते यातील बहुतांश कुस्त्या याबरोबरच सोडवल्या जातात २०१८ साली महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवलेला महाराष्ट्र केसरी बाला शेख व सागर बिराजदार यांच्यामध्ये अंतिम कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली, श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये दोघांनाही बक्षीसाची रक्कम देऊन सन्मान करण्यात आला करण्यात आला व यात्रेची सांगता झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!