दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हाट्सअपवर पोस्ट केल्याबदल ग्रामस्थांच्या वतीने निषेध नोंदवून,यवत पोलिसांना दिले निवेदन.


यवत (दि.२३) वार्ताहर

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्याबद्दल व्हाट्सअप वर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबदल यवत ग्रामपंचायत सदस्य व यवत ग्रामस्थांच्या वतीने भरत भुजबळ व त्यांची पत्नी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला असून याबाबतचे निवेदन यवत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांना देण्यात आले.

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल व कुल कुटूंबीय यांच्या विरोधात सोशल मिडीयावर भुजबळ व त्यांची पत्नी या दोघांनी शिवराळ अपशब्द सोशल मिडीयावरील “सुंदर आपला दौंड तालुका” या व्हाट्सअप ग्रुपवर करण्यात आले होते.भुजबळ याच्या पत्नीने मोबाईल वरून दौंडचे आमदार राहुल कुल व कुल कुटूंबीयांवर अत्यंत एकेरीभाषेत व अपशब्द वापरून तसेच कुल कुटुंबीयांची बदनामी होईल असे शब्द वापरून पोस्ट केलेल्या असल्याने तालुक्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या असून ही महिला एका संघटनेच्या नावाखाली वारंवार लोकांना धमकवणे, अर्वाच्य भाषेत बोलणे असे अनेक प्रकार यापूर्वीही घडलेले असावेत तसेच आमदार राहुल कुल यांच्या बद्दल केलेल्या आक्षपार्ह पोस्ट बाबत यवत ग्रामस्थांच्या वतीने व सर्व पदाधिकारी यांनी तीव्र शब्दांत निषेध करुन या महिलेवर कार्यवाही न केल्यास सबंध तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या महिलेवर अथवा त्या पोस्ट करण्यामागे जो कोणी संबंधित व्यक्ति असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

Advertisement

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब लाटकर, उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्या मनीषा रायकर,मनीषा खुटाळे यांनी आमदार राहुल कुल यांच्या बद्दल केलेल्या पोस्ट बाबत निषेध व्यक्त केला तर बचत गटातील गौरी काळे, स्नेहल बोरावके,सारिका माने यांनी यात्रेनिमित्त महिलांना न विचारता फ्लेक्सवर फोटो लावल्याचे सांगितले व कारवाईची मागणी केली याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी दिले असून यावेळी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश शेळके, सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्या उज्वला शिवरकर , ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, नाथदेव दोरगे, गौरव दोरगे याबरोबरच ह.भ.प महादेव महाराज दोरगे, गणेश शेळके, समीर सय्यद, विशाल भोसले,संदीप दोरगे, प्रकाश दोरगे, उमेश दिवेकर, शीतल शेळके, सीमा दिवेकर, शिला दोरगे यांसह आजी – माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!