क्रिकेटपटूला झटका; भ्रष्टाचार प्रकरणी ३ वर्षाची बंदी!

क्रीडा

या वर्षाच्या सुरुवातीपासून अडचणी आलेला पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल याला जोरदार झटका बसला आहे. आज लाहोर येथील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने भ्रष्टाचार प्रकरणी सुनावणी केली. या सुनावणीत अकमलवर तीन वर्षासाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याआधी उमर अकमलवर निलंबनाची कारवाई केली होती. पाकिस्तान क्रिकेटपटू आणि मॅच फिक्सिंग यासंदर्भात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. याआधी पाकिस्तान बोर्डाने अकमलला पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू होण्याआधीच निलंबित केले होते. ही स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस आधी बोर्डाने ही कारवाई केलेली.

अकमलवर एका सट्टेबाजाला भेटने आणि मॅच फिक्स करण्यासंदर्बात चर्चा केल्याचा आरोप होता. चौकशी समितीने त्याचा मोबाईल जप्त केला होता. गेल्या महिन्यात पीसीबीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अकमलला नोटीस पाठवली होती.

२९ वर्षीय उमर अकमलने पाकिस्तान संघाकडून मार्च २०१९ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्याने २००९ मध्ये पाकिस्तानकडून १६ कसोटी, १२१ वनडे आणि ८४ टी-२० सामने खेळले आहेत. चांगला क्रिकेटपटू असून ही मेहनत न घेतल्यामुळे अकमल नेहमीच आत-बाहेर राहिला आहे. अकमलवर सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *