अमेरिकेत मृत्यू तांडव; एका दिवसात २६०० बळी

आरोग्य देश-विदेश

अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. बुधवारी एकाच दिवसात अमेरिकेत २६०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात एकाच दिवसांत नोंदवण्यात आलेली ही सर्वोच्च संख्या आहे. अमेरिकेत मृतांची संख्या ही ३० हजारांहून अधिक झाली असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.

अमेरिकेत करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन हतबल झाले आहे. याआधी अमेरिकेत एकाच दिवशी २५६९ जणांचा मृत्यू झाला होता. जगातील सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत बुधवारी ३० हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी २६ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

वाचा: WHO: अमेरिकेविरोधात चीन आणि जर्मनीचा सूर
वाचा: करोनावर नियंत्रण: ‘या’ महिला नेतृत्वाने करून दाखवलं!

न्यूयॉर्क राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये दोन लाख १४ हजारांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ११ हजारजणांना मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील करोनाबाधितांची संख्या ही चीन, इटली, स्पेन, जर्मनी, ब्रिटन आदी युरोपीयन देशांपेक्षा अधिक आहे. न्यूजर्सी राज्यातही करोनाबाधितांची संख्या वाढत असून ७० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ३१५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *