बार्टी,सारथी,महाज्योती च्या धर्तीवर समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी “अमृत” संस्थेला लवकर सुरू करण्याबाबत श्री.अभिजित वंजारी आमदार,विधान परिषद ;नागपूर पदवीधर संघ,महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी युवा आघाडी चे निवेदन.

महाराष्ट्र

दि : १०/६/२०२१

बार्टी,सारथी,महाज्योती च्या धर्तीवर समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी “अमृत” संस्थेला लवकर सुरू करण्याबाबत श्री.अभिजित वंजारी आमदार,विधान परिषद

नागपूर पदवीधर संघ,महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी युवा आघाडी चे निवेदन.

20 ऑगस्ट 2019, मंत्रिमंडळातील बैठकीत
बार्टी,सारथी,महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक, युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम,राबवून विद्यार्थी, युवक,युवती इत्यादींचा विकास घडवण्यासाठी Academy Of Maharshtra Research Upliftment And Training (AMRUT) “महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी” (अमृत) ही संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.

22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या(EWS) विकासासाठी अमृत या स्वायत्त संस्थेची नोंदणी कंपनी कायदा 2013 अंतर्गत नियम 8 अन्वये करण्यास मान्यता देण्यात आली होती. व सदर संस्था स्थापन व कार्यान्वित करण्याचे अधिकार बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना देण्यात आले होते.

महाराष्ट्रातीलअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मराठा-कुणबी,इतर मागासवर्ग- विमुक्त जाती भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग या समाजातील घटकांच्या विकासासाठी अनुक्रमे बार्टी,सारथी,तारती(TRTI), व महाज्योती या संस्था आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अशाप्रकारची कुठलीही संस्था सध्या अस्तित्वात नाही तेव्हा 20 ऑगस्ट 2019 च्या मंत्रिमंडळातील बैठकीनुसार व 22 ऑगस्ट 2019 च्या शासननिर्णयानुसार स्थापन झालेल्या “अमृत” या संस्थेस कार्यान्वित करून EWS या घटकाला उपकृत करावे ही महत्वाची मागणी घेऊन आम आदमी पार्टी युवा आघाडी राज्य समिती सदस्या सौ. कृतल वेळेकर आकरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे, नागपूर शहर अध्यक्ष गिरीश तितरमारे, सचिव प्रतीक बावनकर प्रमुख्याने उपस्थित होते.

भूषण ढाकुलकर
नागपूर शहर सचिव,
विदर्भ मीडिया प्रमुख,
आम आदमी पार्टी, राज्य मीडिया संघ
संपर्क: 8928949604, 8600991751

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *