डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन(आंबाझरी नागपुर)पाडण्यात आले. MTDC,NMC जबाबदार

महाराष्ट्र

मुंबई प्रतिनिधी-सौरव आढांगळे

आंबाझरी तलावाजवळ (नागपुर) निसर्गरम्य ठिकाणी तत्कालीन रिपाई पुढा-यांच्या प्रयत्नातुन संबंधित विकासक संस्थेच्या माध्यमातुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्माण करण्यात आले.
धार्मिक, सामजिक, राजकीय वारसा असलेल्या या भवनाचे नविनिकरण करण्याची मागणि असतांना अचानक पणे MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) NMC च्या अधिपत्या खाली असलेल्या भवनाला पाडण्यात आले. या बाबतच्या बातम्या आज दि. १०-७-२१ रोजी स्थनिक वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या.
घटनेचा जाब विचारण्या साठी आज दी. १०-७-२१ रोजी रिपाई (आठवले) शिष्टमंडळ वरिष्ट प्रादेशिक व्यवस्थापक (MTDC) नागपुर यांना भेटले असता त्यांनी आम्हाला या बाबत काहीही माहीती नाही असे सांगितले. रिपाई कार्यकत्यांनी ठीय्या आंदोलन करीत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली.
मागणी
१) डाॅ. आंबेडकर भवन पाडणा-यांवर नियमानुसार तक्रार दाखल करा.
२) करार रद्द करा.
३) त्याच जागेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची त्वरित निर्मिती कार्य चालु करा.
या घटनेला MTDC, व मनपा जबाबदार आहेत.
आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असुन घटनेचा तिव्र निषेध करण्यात येत आहे.
MTDC ने लिखीत ७ दिवसात कार्यवाहीचे करण्याचे आश्वासन दिले आहे.
दोषींना पाठी घालण्याचे प्रयत्न खपवुन घेतले जाणार नाही
*शहराध्यक्ष बाळु घरडे यांच्या नेतृत्वात घेराव करण्यात आला. या प्रसंगी बाळु घरडे, हरिष लांजेवार,राजु फुलके, अनिल मेश्राम, अनिल गजभिये, अमन मेश्राम, निखील कांबळे, ऒम अंबादे, मनोज डांगे, अमोल लोखंडे, सक्षम घरडे, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *