हजारो गरीबांची भूक भागविणारी कुरुंदवाडची दयावान थाळी

कोल्हापूर

हजारो गरीबांची भूक भागविणारी कुरुंदवाडची दयावान थाळी

दयावान तालीम मंडळाचा स्तुत्य उपक्रम जिल्ह्यात आदर्शवत

कुरुंदवाड प्रतिनिधी :
कोरोना काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक फिरस्ते, गरीब नागरीकांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यांची भूक भागविण्याचे पुण्याचे काम कुरुंदवाड येथील कायमच सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणार्‍या दयावान तालीम मंडळाने हाती घेतले, आणी बघता बघता नगरसेवक अनुप मधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दयावान थाळी सुरु करण्यात आली दररोज अडीचशे ते तीनशे दयावान थाळीचे वितरण कुरुंदवाड सह परिसरातील गावात केले जात आहेकोरोना काळात राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गरीब व फिरस्त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यांची जेवणाविणा होणारी उपासमार याची दखल घेवून नगरसेवक व दयावान तालीम मंडळाचे सर्वेसर्वा अनुप मधाळे यांनी शहरातील गरीब व फिरस्त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटविण्याचा निश्चय केला. आणि शहरातील गरीब, फिरस्त्यांना थाळीचे वाटप सुरु केले. ही संकल्पना शहरातील नागरिकांना आवडली आणि मदतीचा ओघ सुरु झाला.
आज दयावान तालीमच्या माध्यमातुन रोज 250 पेक्षा जस्त दयावान थाळीचे वाटप करण्यात येते. यामध्ये इचलकरंजी शहरात 30 जयसिंगपुर शहरात 40 कुरुंदवाड शहरात 125 व कुरुंदवाड येथील कोविड रुग्णाना, शिरढोण-टाकवडे येथील रुग्णाना देखील दयावान थाळीचे वाटप करण्यात येते. आज अखेर दयावान तालीम मंडळाच्या वतीने सहा हजार सातशे थाळींचे मोफत वाटप करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अपंग बांधवांसाठी दयावान तालीम मंडळाचे पदाधिकारी घरपोच सेवा देतात. याच बरोबर जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी या ठिकाणीही फिरस्त्या लोकांना दयावान थाळी पोहोच होते.
दयावान थाळीमुळे दररोज अडीचशे ते तीनशे गरीबांची भूक भागविली जाते. याकामी दयावान तालीमचे अध्यक्ष गिरिधर मधाळे, उपाध्यक्ष अनुप मधाळे, सचिव धम्मपाल ढाले, विशाल मधाळे, स्वप्नील शितोळे, उत्तम शिकलगार, वैभव मधाळे, अर्जुन कोळी ,कपील मधाळे ,आप्पासो मधाळे ,तुषार कांबळे,विजय आमते, विनय कडाळे, शुभम शितोळे, ओंकार कडाळे, विठ्ठल कांबळे, तौसिफ झांजे, मल्लिक कामत, प्रशांत कांबळे, आदित्य कांबळे, भावेश कांबळे आदी दयावान तालीमचे सदस्य काम परिश्रम घेत आहेत. दयावान तालीम मंडळाचा आदर्श जर शिरोळ तालुक्यातील इतर मंडळांनी घेतला तर एकही फिरस्ता, गरीब, विकलांग उपाशी झोपणार नाही हे मात्र नक्की….!
फोटो मेल करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *