नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लाेकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात द्यावे : वंचित बहुजन आघाडीची मागणी

महाराष्ट्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लाेकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात द्यावे : वंचित बहुजन आघाडीची मागणी

वंचित बहुजन आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे. नवी मुंबई साठी ज्या भूमिपुत्रांनी जमीन दिली, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखील दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या दि. बा. पाटील यांनी लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *