जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांची फी रदद करण्यात यावी – ( भाजपा वी आ जिल्हाअध्यक्ष) पवन गरड

महाराष्ट्र

जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांची फी रदद करण्यात यावी – ( भाजपा वी आ जिल्हाअध्यक्ष) पवन गरड

मलकापूर प्रतिनिधी, दिपक इटणारे

सध्या जगभरात कोरोना महामारी ने थैमान घातलेले आहे. मागील दीड वर्षापासून कोरोना महामारी मुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झालेले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडलेले आहे. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत, त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार यांच्या मार्गदर्शनात आज जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांची फी रदद करण्यात यावी या मागणीसाठी भाजपा जिल्हा विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पवन गरड जिल्हाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी यांनी निवेदन दिले.
कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत. यासोबतच महाविद्यालयातीळ वाचनालये, व्यायामशाळा, सायकल स्टँड, सर्व बंद आहेत, मागील वर्ष भरापासून शाळा महाविद्यालये बंद असतांना देखील अनेक शाळा, महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तकादा लावला आहे. यात वाचनालय, व्यायामशाळा, सायकल स्टँड इत्यादींचे शुल्क देखील आकारण्यात आले आहेत. एकीकडे सर्वसामान्य जनतेला उदरनिर्वाहासाठी कष्ट घ्यावे लागत असताना ते शाळा महाविद्यालयांची फी कुठून भरणार, त्यामुळे अनेकांवर शाळा सोडण्याची वेळ येऊ शकते, अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागत आहे. त्यामुळे जिलहाधिकारी यांनी सर्व शाळा महाविद्यालयांना आदेश देऊन शाळेव्दारे आकारण्यात आलेल्या शुल्क़ रदद करण्यात यावे अशी मागणी भाजपा जिल्हा विद्यार्थी आघाडीच्या वतीने एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
त्यामुळे जिल्हाभरातील शाळाना आदेश देण्यात येऊन शाळा फी रद्द करण्यात यावी किंवा त्यात सूट देऊन अत्यल्प किंवा नाममात्र शुल्क घेण्याबाबत आदेश शाळांना देण्यात यावे ही विंनती केली यावेळी भाजपा विद्यार्थी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस आशिष सुरेका,जितू मोरे,
ऋषिकेश नालिंदे,वैभव अढाव,ऋषिकेश देशमुख,आदित्य उदयकर तसेच भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पवन ठाकूर,विजय दिवाने, नितीन काळे,आकाश काळे,मोहन रावनकर,सागर जैस्वाल,चेतन, पाटील,आकाश लटके,क्रितेश अग्रवाल भाजपा विद्यार्थी आघाडी सचिव सुपेश साखरे,संकेत पाटील,अभिषेक देशमुख,वैभव तुपकर,विनोद भुसारी,गोपाल तायडे भाजपा विद्यार्थी आघाडी सहसचिव राहुल जाधव,नकुल राज लोंढे,विनायक लोंगेरे, तेजस भंडारी,मोहन सोनवणे,सतीश गीते तथा भाजपा विद्यार्थी आघाडी सोशल मीडिया प्रमुख प्रीतम चव्हाण,वेदांत पाठक,प्रज्वल गीते,यश उदयकार व इतर भाजपा विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *