माणुसकी फौंडेशनच्या महिला शाखेचा शुभारंभ

कोल्हापूर


इचलकरंजी/प्रतिनिधी –
केवळ उपक्रम राबविण्यापुरती नव्हे तर आपल्या कार्यातून खर्‍या अर्थाने माणुसकी जपणार्‍या इचलकरंजीतील माणुसकी फौंडेशनच्या या कार्यात आता तरुणीसुध्दा हिरीरीने सहभागी होत आहे. त्याच अनुषंगाने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य माणुसकी फौंडेशनची महिला शाखा सुरु करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विकास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सपोनि विकास जाधव,   माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रविंद्र जावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच महिला शाखेचा शुभारंभ करत असल्याचे जाहीर केले. कोणत्याच क्षेत्रात महिला आता मागे राहिलेल्या नाहीत, याचा प्रत्यय समाजाच्या मदतीसाठी पाऊल  टाकत रणरागिनींनी आणून दिला आहे.
सपोनि विकास जाधव यांनी, कोरोनाच्या काळात सुरु असलेल्या जेवण आणि औषधोपचार  सेवेसाठी मदत करणार्‍यांचे आभार मानले. माणुसकी फौंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होणार्‍या तरुणी-महिलांनी प्रत्येक कार्यात सक्रिय राहण्याबरोबर स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. यावेळी संजना हेब्बाळकर हिने मनोगत व्यक्त करता प्रत्येक कार्यात आम्ही सर्वजणी पुढे राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी जयश्री सुतार, रुपा गिरंगे, सविता येलपले, निता कासार, राजश्री सुतार, सुलोचना मांजरेकर, निता चव्हाण, अनिता चव्हाण, त्रिवेणी हनगंडी, वंदना कोष्टी, प्रज्ञा चव्हाण, स्मिता कासार, गौरी सुतार, सोनाली चव्हाण, स्वप्नाली हेब्बाळकर आदींसह इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, सहकारी, माणुसकी फौंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *