शुल्लक कारणावरून दोन युवकात हाणामारी एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

क्राइम मनोरंजन

शुल्लक कारणावरून दोन युवकात हाणामारी एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मलकापूर प्रतिनिधी, दिपक इटणारे

मलकापुर तालुक्यातील वडोदा ( पान्हेरा ) येथे 7 जूनला रात्री साडेआठच्या सुमारास ओट्यावर बसण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन युवकांत हाणामारी झाली होती . यात गंभीर जखमी झालेल्या 35 वर्षीय युवकाला उपचारसाठी नागपूरला हलवले जात असताना 9 जूनला मृत्यू झाला . या प्रकरणात मलकापूर ग्रामीण पोलीस आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला . युवकाच्या पित्याने मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला . त्यामुळे भांबावलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला . त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले . वडोदा ( पान्हेरा ) येथील गणेश रमेश बोंडे ( 35 ) हा 7 जूनच्या रात्री साडेआठला घराजवळील ओट्यावर बसण्यासाठी गेला होता . तिथे बसण्याच्या कारणावरून विजय ऊर्फ दामू प्रफुल्ल शिंबरे याने त्याच्याशी वाद घातला . वादातुन झालेल्या हाणामारीत शिंबरेने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने गणेश गंभीर जखमी झाला .मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते . मात्र परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आले होते . अकोल्यावरून नागपूरला नेत असताना काल रात्री वाटेतच त्याचे निधन झाले . याबाबतची फिर्याद मृतकाचे वडील रमेश विठ्ठल बोंडे ( 60 ) यांनी दिल्याने ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे . तपास पोलीस उपनिरीक्षक तायडे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *