शेत रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार – आमदार राजेश एकडे

महाराष्ट्र राजकीय

शेत रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार – आमदार राजेश एकडे

मलकापूर प्रतिनिधी, दिपक इटणारे

बेलुरा शिवारातील शेत रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे* यांच्या हस्ते संपन्न झाले.शेत रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असे प्रतिपादन यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी केले. सदर शेतरस्त्या साठी आपल्या शेती मधील जागा उपलब्ध करून देणाऱ्या कमलाबाई विश्वासराव शिंगोटे यांचा सत्कार देखील आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर भूमिपूजन समारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानराव धांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.अनिल धनोकार, श्री.संजय सिंह राजपूत,उपसरपंच सीमाताई मेहेंगे, ग्रामपंचायत सदस्य सत्यभामाताई घनोकार, शुद्धमतीताई घनोकार, प्रतिभाताई घनोकार, संगीताई तांगडे,मधुकर हिवाळे,माजी सरपंच विनोद मेहेंगे,पंढरीभाऊ पाटील,जवळा बाजार येथील सरपंचपती अशोकभाऊ डीवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *