कारुण्य व उदंड मानवतेचे सर्जनशील ज्वलंत उदाहरण म्हणजे मातोश्री रमाई …..अतिशभाई खराटे (सुरत गुजरात येथे रमाईना अभिवादन)

देश-विदेश

कारुण्य व उदंड मानवतेचे सर्जनशील ज्वलंत उदाहरण म्हणजे मातोश्री रमाई …..अतिशभाई खराटे
(सुरत गुजरात येथे रमाईना अभिवादन)

मातोश्री रमाई आंबेडकर यांनी जीवनभर संघर्ष केला व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली त्यांनी स्वाभिमानाने दुःखांशी, अडचणीशी, गरिबीशी सामना केला त्यामुळेच दुःख,त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड, मानवता व अथांग प्रज्ञान यांचे सर्जनशील ज्वलंत उदाहरण म्हणजेच माता रमाई आहेत असे प्रतिपादन अतिशभाई खराटे बुलडाणा जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी यांनी सुरत ( गुजरात) येथे माता रमाई स्मृदिनानिमित्त केले
लाॅर्ड बुद्धा मेत्ता संघकाया फाउंडेशन द्वारा संचालित विश्व शांतिदूत महाबोधी बुद्ध विहार शांति नगर नीलगिरी लिम्बायत सुरत (गुजरात) येथे त्यागमुर्ती मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या स्मृति दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिनाताई सुभाष झाडे प्रमुख नवज्योति महिला विकास मंडळ ह्या होत्या तर प्रमुख अतिथि अतिशभाई खराटे वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव बुलढाणा महाराष्ट्र, सुभाषभाई झाडे विश्व शांतिदूत महाबोधी बुद्ध विहार संस्थापक अध्यक्ष,भंते धम्मरक्षित सुभाषभाई धुरंधर बामसेफ, गौतम इंगळे गुजरात प्र.सह प्रभारी, श्रीकृष्णजी वानखडे कवि गायक सुरत,
शोभाबाई मराठे सुरत जिल्हा महिला प्रमुख भिम आर्मी, गोविन्द पिंपळीसकर बोद्धाचार्य यांची उपस्थिती होती
याप्रसंगी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले तथा रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले
यावेळी मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आयु बेडसे मास्टरजी वंबआ गु,प्रदेश सह प्रभारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेशभाऊ अंभोरे दर्दी सेवा समिति सुरत जिल्हा उपप्रमुख यांनी मानले,या स्मृतिदिनी उपासक व उपासीका संघ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *