महिन्याभरात रेल्वे प्रवाशांमध्ये तब्बल ७२५ प्रवाशी कोरोना बाधित…

आरोग्य राजकीय

स्वप्निल गंगावणे (मुंबई प्रतिनिधी)

मुंबई – मुंबई सह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतं असली तरी या कोरोनाला मुळापासून नष्ट करायला महापालिका आणि राज्य सरकार ने कोरोनाची चाचणी करण्याचं प्रमाण वाढवलं आहे.शिवाय परराज्यातून आणि महाराष्ट्रातील विविध भागातून रेल्वेने दाखल झालेल्या प्रवाशांची ही कोरोना चाचणी केली जातं आहे.त्यानुसार,१७ एप्रिल ते २६ मेपर्यंत तब्बल ७२५ प्रवाशी कोरोनाबाधित आढळले.त्यांना तात्काळ कोरोना केंद्र, रुग्णालय,गृहविलगीकरणात पाठवण्यात आले आहे.
पश्चिम रेलवे च्या मुंबई सेंट्रल,वांद्रे टर्मिनस,बोरिवली, वसई रोड तर मध्य रेलवेच्या सीएसमटी,दादर टर्मिनल,लोकमान्य टर्मिनस, ठाणे,कल्याण,पनवेल स्थानकात या चाचण्या होतात.१७ एप्रिल ते २६ मेपर्यँत २लाख ७६ हजार ३५९ प्रवाशांची कोरोना चाचणी केली.त्यात ७२५ प्रवाशी कोरोनाबाधीत आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *