नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचा दणका

महाराष्ट्र राजकीय


मुंबई प्रतिनिधी-सौरव आढांगळे

मुंबई:- तमाम आंबेडकरी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या दादर येथील चैत्यभूमिच्या जवळ बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वतीने सेल्फी पॉइंट व लव्हर्स पॉइंटचे काम सुरु करण्यात आले होते.
काल दिनांक २५ मे रोजी नामदार रामदासजी आठवले साहेबांनी महानगर पालिकेचे आयुक्त ईकबाल सिंग चहल यांना पत्र देवून हे पॉइंट येथून हलविन्यात यावे असा आदेश दिला होता.
आज दिनांक २६ मे रोजी नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार रिपाइचे राष्ट्रीय सचिव मा . दयालजी बहादुरे , जिल्हाध्यक्ष सिद्धार्थजी कासारे , पदवीधर मतदार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष घनश्यामजी चिरणकर , वडाळा नायगांव तालुकाध्यक्ष गौतमजी गायकवाड आदि रिपाइ नेत्यांनी त्याठिकाणी घाव घेवून आंदोलन केले , व सदरचे काम बंद करण्यास भाग पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *