पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष पदावरून अजित पवार यांना तत्काळ हटवावे ,मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार जबाबदार : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

महाराष्ट्र राजकीय

पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष पदावरून अजित पवार यांना तत्काळ हटवावे

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार जबाबदार : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

सांगली दि.०५ : मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. महाआघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती अद्यापही नेमलेली नाही. याबाबतचा जीआर देखील सरकारने काढलेला नाही. पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद मागासवर्गीय मंत्र्यास द्यायला हवे होतेपण तसे  करता अजित पवार  यांना कसे काय ही जबाबदारी देण्यात आले, मुळातच अजित पवार यांच्याकडूनच पदोन्नती आरक्षण संबधित अडथला निर्माण केला जात आहे  याबाबत मागासवर्गीय समाजात प्रचंड असंतोष आहे .२०१८ च्या एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडा नुसार अनुसूचित जाती -जमाती यांना मागासलेपण सिद्ध करण्याची गरज नाही,  त्यामुळे या राज्य सरकारने तत्काळ  मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाची अमलबजावणी करणे अपेक्षित होते पण तसे होताना दिसत नाहीमराठा आरक्षण प्रमाणेच मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारचा निष्काळजीपणा दिसून येत आहेयामुळे मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांना या पदावरून तत्काळ हटवावे अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

बुधवारी मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण असंवैधानिक असून ते रद्द केले. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने ठोस भूमिका मांडली गेली नाही, यामुळे विद्यार्थी, तरुण वर्ग संतप्त झालेला आहे , सरकारी नोकरी व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *