ऐतिहासिक माणगांव दस्तऐवजजगभरातील विचावंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करुन उपलब्ध करून दिला जाईल

देश-विदेश

माणगांव। भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायक मधील ऐतिहासिक माणगांव परिषदेतील भाषण,छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व त्या परिषदेतील पारित झालेले पंधरा ठराव यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे मार्फत देशी व परदेशी भाषेत अनुवाद करुन हा ऐतिहासिक दस्तऐवज या शताब्दी वर्षानिमित्त जगभरातील विचावंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करुन उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन ऐतिहासिक माणगांव परिषदेच्या101 शताब्दी निमित्ताने सन्मान भूमी माणगांव येथेडॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज याना अभिवादन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी केले .प्रारंभी माणगांव परिषद राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्यकर्ते व बौध्द समाजाचे माजी अध्यक्ष समाज भूषण अनिल कांबळे माणगांवकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून शिवाजी विद्यापीठाने पाक्षिक मूकनायक मधील ऐतिहासिक माणगांव परिषद संबंधित वृत्तांत, भाषणे,ठराव यांचे विद्यापीठातील हिंदी,इंग्रजी व परदेशी भाषा विभागांनी अनुवाद करून शताब्दी वर्षात जगभरातील विचारवंत व अभ्यासकाना उपलब्ध करून द्यावे अशी कुलगुरू यांचे कडे मागणी केली व स्मारकाचा आढावा घेतला या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक प्रा डॉ श्रीकृष्ण महाजन यांनी आपल्या मनोगतात शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठाने चर्चासत्र, व्याख्यानांचे आयोजन केल्याची माहिती दिली या वेळी मा कुलगुरू व विद्यापीठाचे पदाधिकारी यांनी स्मारक,लंडन हाऊस, होलोग्राफीक शो,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्कामाची पुनीत झालेली कागल जहागिरीतील शाळा इमारत याना भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले या कार्यक्रमास प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील, कुलसचिव डॉ व्ही डी नांदवडेकर,डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे डॉ एस एस महाजन, जनसंपर्कअधिकारी डॉ अलोक जत्राटकर बौध्द समाजाचे अध्यक्ष अरुण शिंगे,शिरीष मधाळे, नाना बिराजे,भिकाजी शिंगे, श्रीकांत चव्हाण, पांडुरंग कांबळे, भीमराव कांबळे, सुधाकर कांबळे योगेश सनदी इत्यादी उपस्थित होते आभार नंदकुमार शिंगे या मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *