आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते एवायएम जेपीएल हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर क्रीडा

इचलकरंजी/प्रतिनिधी –
समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आचार्यश्री आनंद युवा मंचच्यावतीने सलग सहाव्या वर्षी आयोजित ‘एवायएम जेपीएल  हाफपिच क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, जर्सी प्रायोजक भरत-अखिल-निखिल बोहरा, प्रथम क्रमांक प्रायोजक मुकेश पुनमिया, द्वितीय क्रमांक प्रायोजक प्रकाश बोरा, मंडळाचे आधारस्तंभ दिलीपजी मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
 या स्पर्धेत एकूण 12 संघांचा सहभाग असून पहिल्या टप्प्यात साखळी पध्दतीने लढती होत आहे. स्टेशन रोडवरील केएटीपी च्या मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेत एचव्ही स्मॅशर्स, दबंग एमटीटी, एमके वॉरिअर्स, युनिटी स्पोर्टस्, प्रसन्न बॉईज, पेरीटस रायडर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली. यामध्ये दबंग एमटीटी व युनिटी स्पोर्टस् यांच्या लढतीत निर्धारीत षटकात दोन्ही संघांची धावसंख्या समान झाली. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. त्यामध्ये युनिटी स्पोर्टस्ने विजय प्राप्त केला.
स्वागत सुमित मुनोत, करण मुथा, लाभम भलगट, निलेश मुथा, रितेश चोपडा, प्रफुल्ल बोरा,सुदिन चोपडा, आदेश कटारियानी यांनी केले. प्रास्ताविकात प्रितम बोरा  यांनी मंडळचा उद्देश व स्पर्धेबद्दल माहिती विषद केली. आभार योगेश भलगट यांनी मानले. याप्रसंगी राजेंद्र बोरा, सुमतीलाल शहा, दिनेश चोपडा, मयूर पिपाडा, महेंद्र   बोरा, संजू मुथा, स्वप्निल बोरा, राकेश बंब, यश बोहरा, अक्षय बोहरा, पंकज बाबेल, जितेंद्र जैन, रूपेश चोपडा, नितीन बोरा, मुकेश चोपडा आदींसह क्रिकेटप्रेमी व समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *