गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथ्थक नृत्य विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल कु. सृष्टी चंद्रशेखर शहा हिचा सन्मान

कोल्हापूर मनोरंजन

पदन्यास नृत्यकला अकादमी या संस्थेच्यावतीने नृत्य विशारद सन्मान आणि नृत्यकला गौरव समारंभ संपन्न

इचलकरंजी/प्रतिनिधी –
पदन्यास च्या माध्यमातून आणि सौ. सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधर्व महाविद्यालय मंडळाची कथ्थक नृत्य विशारद पदवी प्राप्त केल्याबद्दल कु. सृष्टी चंद्रशेखर शहा हिला अ. भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव बाळकृष्ण विभुते, नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत फाटक, डॉ. एस. पी. मर्दा आणि निवृत्त उपप्राचार्य प्रा. अशोक दास यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पदन्यास नृत्यकला अकादमी या संस्थेच्यावतीने नृत्य विशारद सन्मान आणि नृत्यकला गौरव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कथ्थक नृत्य विशारद पदवी प्राप्त करणार्‍या विद्यार्थिनींचा त्याचबरोबर इचलकरंजी शहरात पंधरा वर्षांहून अधिक काळ नृत्य क्षेत्रात कार्यरत असणार्‍या प्रशिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कु. सृष्टी हिने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरविण्यास सुरुवात केली होती. सायली होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आपल्या नृत्य कलेने वाहवा मिळविली होती. ती आता कथ्थक नृत्य विशारद झाली असून या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *