बकरी चोरीसाठी वाहन चोरी करणाऱ्या कुरेशी टोळीतील सदस्य खडकी पोलीसांच्या जाळ्यात ;बकरी चोरीचे ४०गुन्हे उघड करून एकुण२८,३६०००/-(अठ्ठावीस लाख छत्तीस हजार)रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राइम महाराष्ट्र

खडकी पोलीस स्टेशन कडून वाहन चोरी करणारे अट्टल वाहनचोरांची टोळी उघड त्यातील अरोपी अँलेक्स लाँरेन्स ग्रेम्स यास अटक करून वाहन व बकरी चोरीचे ४०गुन्हे उघड करून एकुण२८,३६०००/-(अठ्ठावीस लाख छत्तीस हजार)रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

पुणे – मागील दोन वर्षात पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसह राज्यभरात बकऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. बकरी चोरीला गेल्यावर मालक तक्रार करण्याच्या फंद्यात पडत नाही. ही संधी साधत बकरी चोरण्याचा सपाटाच कुरेशी गॅंगच्या नव्या सदस्यांनी लावला होता. या गॅंगचा एक सदस्य नुकताच खडकी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

त्याच्या चौकशीत पोलिसांनी तब्बल 36 चोरीची वाहने हस्तगत केली आहेत. त्याची किंमत 28 लाख 36 हजार इतकी आहे. या चोरीच्या वाहनांचा वापर करुन कुरेशी गॅंगने राज्यभरात धुमाकुळ घातला होता. ऍलेक्‍स लॉरेन्स ग्रॅम्स असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे शिक्षण एसवाय पर्यंत झाले आहे.
त्याच्या इतर चार साथीदारांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनाराच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना एक टोळी जेरबंद करण्यात आली होती. यावेळी ऍलेक्‍स हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्याचा माग काढत असताना, पोलिसांना दररोज त्याच्या कारनाम्याची नवनवी माहिती मिळत होती.

त्यानूसार त्याने अनेक वाहन चोरीचे व बकरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले. त्याला ताब्यात घेतले असता, तो कुरेसी गॅंगचा सक्रीय सदस्य असल्याची माहिती मिळाली. त्याने व त्याच्या साथीदारांनी अनेक जिल्हयातून गोठ्यात बांधलेल्या तसेच चरायला सोडलेल्या बकऱ्या चोरुन नेल्याचे उघड झाले. त्याने 50 पेक्षा जास्त वाहन चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली आहे.

त्याने पुणे, पिंपरी-चिंचवड , सोलापूर, अहमदनगर व ईतर जिल्हयात गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून 26 दुचाकी, चारचाकी सहा, तिनचाकी चार अशा एकून 36 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहे. तर बकरी चोरीच्या चार गुन्हयासह त्याचे 40 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पो.नि.श्री दत्ता चव्हाण, पो.नि.गुन्हे श्री शफिल पठाण, यांचे नेतृत्वाखाली खडकी पो.स्टेशन तपास पथक प्रमुख पो.उपनिरीक्षक श्री प्रताप ल.गिरी,पो.उप.नि.अमोल भोसले, पो.हवा. जाधव, पो.ना.संतोष सावंत, पो.ना.गणेश लोखंडे,पो.ना.राजकीरण पवार, पो.ना. गणेश काळे, पो.काँ.संदीप गायकवाड, पो.काँ.अनिरुद्ध सोनवणे, पो.काँ.धवल लोणकर, पो.काँ.अनिल पो.काँ.भगवान हंबडे,पो.काँ.महादेव गोपनर,पो.काँ.स्वपनिल घोलप, पो.काँ.म्हस्के, पो.काँ.पठाण, पो.काँ.शेवाळे, पो.काँ.विवेक बसनगार,यांनी केली असून गुन्हयांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रताप ल.गिरी हे करीत आहेत…

बकरीसाठी चोरीची गाडी –
कुरेशी गॅंग बकरी चोरीसाठी प्रथम वाहने चोरत होती. या चोरीच्या वाहनाचा वापर करुन पुणे,पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्हयातील ग्रामीण भागात जाऊन बकऱ्या चोरत होते. यानंतर चोरलेल्या गाड्यांचे नुकसान करुन त्या निर्जन ठिकाणी सोडत होते. चोरलेल्या बकऱ्या तातडीने कसायाला विकल्या जात होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *