जिल्हा क्रीडा पुरस्कार सन-2020-21 साठी इच्छुक खेळाडूंनी अर्ज करावेत

महाराष्ट्र

अलिबाग,जि.रायगड दि.23 :- क्रीडा व युवक सेवासंचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड द्वारा जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडापटू (1 महिला, 1 पुरुष, 1 दिव्यांग खेळाडू), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक 1 यांच्या कार्याचे/ योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2002 पासून देण्यात येतो.
रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू, मार्गदर्शक यांना हा पुरस्कार दि.26 जानेवारी 2021 रोजी देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सन 2020-21 च्या पुरस्कार वितरणासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पुरस्काराचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रु.10,000/- असे स्वरुप आहे. पुरस्काराकरिता दि.1 जुलै 2016 ते 30 जुन 2020 पर्यंतची कामगिरी/कार्य ग्राहय धरण्यात येईल.
पुरस्काराचे थोडक्यात निकष खालीलप्रमाणे आहेत.
1) गुणवंत खेळाडू- या पुरस्कारा अंतर्गत तीन पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू यांना सदरचा पुरस्कार देण्यात येणार आहे. 1) संबंधित जिल्हयामध्ये खेळाडूचे लगत पूर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्हयाचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनधित्व केले असले पाहिजे 2) खेळाडूंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धामधील पुरस्कार वर्षाच्या राज्य व मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य/राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धामधील पुरस्कार वर्षाच्या राज्य व राष्ट्रीयस्तरावील वरिष्ठ/कनिष्ठ शालेय ग्रामीण व महिला (पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान) मधील राष्ट्रीय स्तरावील कामगिरी लक्षात घेण्यात येईल. यापैकी उत्कृष्ट ठरणाऱ्या तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल. 3) खेळाडू त्याचा अर्ज विहित नमुन्यात व विहित मुदतीत या कार्यालयात सादर करावा. 4) खेळाडूने स्पर्धांच्या मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत सादर करणे आवश्यक राहील. 5) खेळाडूंचा अर्ज अधिकृत जिल्हा संघटनेमार्फत शिफारास करुन सादर करणे आवश्यक राहील तथापि अपवादात्मक परिस्थितीत खेळाडू वैयक्तिक रित्या अर्ज करु शकतील 6) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे.
2) क्रीडा मार्गदर्शक- 1)पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे 2) संबंधित जिल्हयात क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले पाहिजे व वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरिता त्या जिल्हयातील खेळाडूंची कामगिरी ग्राहय धरली जाईल. 3) एका जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यात प्राप्त राहणार नाही 4) एकदा एका खेळामध्ये किंवा एक प्रवर्गामध्ये जिल्हा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता अर्ज करण्यात पात्र असणार नाही.
जिल्हा क्रीडा पुरस्कार 2020-21 करीता विहित नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहितीसाठी इच्छुकांनी व्यक्तिश: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेऊन हे परिपूर्ण अर्ज दि.0 3 जानेवारी 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.संजय महाडिक यांनी केले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *