पतसंस्थांना जाचक ठरणार्या अटी शिथिल करा.. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आ.अबिटकर यांची मागणी

महाराष्ट्र


मुंबई : पतसंस्थांना जाचक ठरणार्या नियामक मंडळाच्या अटी शिथिल करा.अशी मागणी आ.प्रकाश आबिटकर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे बुधवारी केली.याप्रश्नी पतसंस्थाच्या प्रतिनिधीची बैठक घ्यावी आणि याबाबतचा अहवाल सादर करावा असे आदेश पाटील यांनी सहकार आयुक्तांना दिले.
कांही ठराविक पतसंस्था अडचणीत आल्याने सर्वच पतसंस्थावर नियंत्रणासाठी सहकार अधिनियमात सुधारणा करून नियामक मंडळ स्थापन केले.या मंडळाच्या जाचक नियम व अटीमुळे पतसंस्थाना व्यवसाय करणे अडचणी ठरत आहे. याबाबत आ.आबिटकर यांनी पतसंस्थाच्या विविध प्रश्नांवर बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवार 20 डिसेंबर रोजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंञालयात बैठक घेतली.
यावेळी सहकारमंञी पाटील म्हणाले, पतसंस्थांवरील निर्बंधासाठी असे नियम करणे शासनाला भाग पडले.नियामक मंडळाकडून पतसंस्थांना अडचणी निर्माण होत असतील तर सहकार आयुक्त यांचे स्तरावर बैठक घेतली जाईल. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियामक मंडळाबाबत निर्णय घेऊ तोपर्यंत नियामक मंडळाने लागू केलेल्या आदेशांना तात्पुरती स्थगिती देण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले.
संघटनांच्या प्रतिनिधींच्या सुचना अशा आहेत. पतसंस्थांच्या ठेवीपैकी 0.05टक्के अंशदान रक्कम अट रद्द करा, “अ”वर्ग सभासदांकडूनच ठेवी स्विकारण्याची अट शितिल करावी, संस्थाना कर्ज व अग्रीम देण्यास घातलेले बंधन उठवावे, संस्थांच्या गरजा व सेवेनुसार अन्य व्यवहारास केलेली मनाई रद्द करावी, “अ” वर्ग सभासदाशीच व्यवहार करणेचे अट शितिल करावी, कर्ज वसुली करण्यास सहकार विभागाने सहकार्य करावे आदी मागण्या यावेळी आ.अबिटकर व आ.राजेश पाटील यांनी केली. यावेळी राज्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणार्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुचना मांडल्या.
या बैठकीस आ.राहूल जगताप, सहकार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, सहकार आयुक्त अनिल कवडे, विभागीय सहनिबंधक विजय वाडेकर, अवर सचिव रमेश शिंगटे, पतसंस्था संघटना प्रतिनिधी काका कोयटे, जितेंद्र टोपले,अर्जुन आबिटकर, शांतराम भिंगुर्डे, सुरेश गुंडे, दयानंद भुसारी, रंगराव पाटील, महेश कडाले, बाळासाहेब कदम, सुधाकर पिसे, श्रीनिवास जोशी, शांतराम हाजगुळकर, विश्वनाथ चव्हाण, चंदू गाडेकर,श्रीमती सुरेखा लवांडे , रमेशकुमार मिठारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *