जुलमी व्यवस्थेतून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधायके आणली – सदाभाऊ खोत

महाराष्ट्र राजकीय

इचलकरंजी/प्रतिनिधी –
शेतकर्‍यांची अडते, मार्केट कमिटीच्या जोखडातून मुक्तता व्हावी, त्यांना स्वातंत्र्य मिळावे यासाठीच केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर केली आहेत. परंतु राजकीय स्वार्थापोटी काही पक्षांकडून शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यातूनच या विधेयकाला लागलेली दृष्ट, वाईट भावना दूर व्हाव्यात यासाठी सोमवार 14 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती आणणार्‍या विधायकांना दुधाचा अभिषेक घालण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक तथा माजी कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ही विधायके शेतकर्‍यांच्या हिताची असून गेली सत्तर वर्ष भांडवलशाही व्यवस्थेत खितपत पडलेल्या शेतकर्‍यांच्या बाजूचे आहेत. या विधेयकामुळे शेतकर्‍यांना हमीभाव मिळण्याबरोबरच शेतीमाल साठवणूकीच्या बंधनातून मुक्तता होणार आहे. गेल्या सत्तर वर्षात शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही. शेतकर्‍यांच्या शेतीमाल खरेदी विक्रीसाठी मार्केट कमिट्या स्थापन झाल्या. पण त्यांनी भांडवली व्यवस्थेमध्ये शेतकर्‍यांची केवळ लूटच केली. या कमिटीमध्ये शेतकर्‍यांना मताचा अधिकार का दिला जात नाही असा सवाल करत त्यांनी या मार्केट कमिट्या म्हणजे शेतकर्‍यांची मंदिरे नसून कत्तलखाने असल्याचा आरोप केला. अशा जुलमी व्यवस्थेतून शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही विधायके आणली आहेत.
फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेज उभारण्यात येणार असून शेतीवर केवळ शेतकर्‍याचीच मालकी राहणार आहे. शेतातील उत्पादनाबाबत शेतकरी व व्यापारी यांच्यात करार होणार आहे. खरेदीसाठी मोठ्य प्रमाणात व्यापारी येणार असल्याने स्पर्धा वाढून शेतीमालाला चांगला भाव मिळणार आहे. त्यातून उत्पादनाची वाहतुक, दलाली, हमाली यासह अन्य खर्चाची बचत होणार आहे. एकूणच ही विधायके शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचे प्रतिक आहे.
काँग्रेसने यापूर्वी मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. आपल्या जाहीरनाम्यात या विधेयकाची बाजू घेतली. तर आत्ता विरोध का? त्यातूनच काँग्रेसचा खरा मुखवटा जनतेसमोर आला आहे. काँग्रेसच्या धोरणामुळेच देशात आजपर्यंत पाच लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कॉन्ट्रक्ट शेतीला सुरूवात केली. आणि आपल्या आत्मचरीत्रात शेती बंधनमुक्त झाली तरच प्रगती होईल असेही नमुद केले आहे. त्यामुळे लोक असली खोटी आत्मचरित्रे वाचणे बंद करतील, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *