बळीराजाबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचा इचलकरंजीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

महाराष्ट्र राजकीय

इचलकरंजी/प्रतिनिधी –
जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचा इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने तीव्र निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलक व पोलिस यांच्यात झटापटही झाली. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
केंद्र सरकारकडून सातत्याने इंधन दरात वाढ केली जात असल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. त्यातच शेतकर्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी दिल्लीत आंदोलन सुरु केले असताना परिस्थितीचे भान न ठेवता भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबद्दल बेताल वक्तव्य करुन शेतकर्‍यांचा अपमानच केला असल्याचा आरोप शिवसेनानेत्यांनी केला. मोदी सरकारच्या या चुकीच्या धोरणा विरोधात शनिवारी शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करत रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवत त्यामध्ये सुधारणा न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, नगरसेवक रविंद्र माने, मलकारी लवटे, आण्णासाहेब बिलुरे, विजय जोशी, धनाजी मोरे, महेश बोहरा, आप्पासाहेब पाटील, संजय पाटील, लक्ष्मण पाटील, संतोष गौड, बाळासो मधाळे, गणेश जंगटे, राजू आरगे, बसय्या स्वामी, मनोज भाट, मधुमती खराडे, मंगल मुसळे, शोभा कोलप, सविता सपाटे, अस्लम खलिफा, दिलीप शिंदे, नितीन कुगे, बापू जाधव, विक्री जाधव, बालाजी हुलेमनी, रावजी कोंडेकर, सचिन खोंद्रे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *