संगीता आनंद गायकवाड उतरंड चित्रपटा मुळे नावारुपाला आली

मनोरंजन

झोपडीत राहणारी आणि ते देखील भाड्याच्या झोपडीत. ज्या मुलीचा बाप सोसायटीची वॉचमन गिरी करून कुटुंबाचे पोट भरतोय, आणि आई मोल मजुरी करतेय अशा घरची पोरगी कधी सिनेमाची नायिका बनलेली ऐकली आहे का? आणि वरून जयभिम वाली?
नसेलच ऐकली पण मी मात्र बनलेय. मी संगीता आनंद गायकवाड उतरंड चित्रपटा मुळे आज नावा रुपाला आले आहे ! एक दोन फिल्म च्या ऑफर येताहेत. त्याचे सर्व श्रेय मी डायरेक्टर सुदाम वाघमारे यांना देईन.
या झगमगाटी दुनियेत तोंडात सोन्याचे चमचे घेऊन जन्मणाऱ्या बामन बनियाच्याच पोरी ठाण मांडून बसलेल्या दिसतात. जातीय समीकरणे इथेही बेमालूम पणे काम करतांना दिसतात, त्यामुळे गोर गरिबांना आणि त्यातल्या त्यात मागासवर्गीयांना कोण विचारतय?
मी लहानपणा पासून लावण्या करीत आलेय. अनेक एकांकिका लोकनाट्या मधून काम करत आले… हजार बाराशे बिदागी मिळायची त्यातुन थोडी फार ती काय कुटुंबाला सुखावळ मिळायची! कधी मोठ्या सिनेमांत काम मिळेल असे वाटत नव्हते.
पण एके दिवशी एका कॉर्डीनेटर ने मला सुदाम वाघमारे सरांकडे नेलं. सरांनी माझी साधी ऑडिशन देखील घेतली नाही फक्त नाव विचारलं, आणि डायरेक्ट सेटवर नेऊन उभं केलं. वन टेक मध्ये सिन ok झाला!
नुसतं बघून selection करणारा स्वतःवर इतका कॉन्फिडन्स असणारा डायरेक्टर मी पहिल्यांदाच बघितला.
यापूर्वी मी जिथे जिथे ऑडिशन ला गेले सर्व लोक compromise बद्दल बोलायचे. सगळेच ववखलेले.. पण या व्यक्तीला पाहिले आणि त्याचे आदरपूर्वक नम्रतापूर्वक बोलणे ऐकले आणि मी इतकी निर्धास्त झाले की ठरवून टाकले की कामात झोकून द्यायचे.
सुदाम सरांच्या स्वभावावर आमचं सर्वच कुटुंब फिदा झालं होतं. खैरलांजी बद्दल मी ऐकलं होतं पण इतकं भयाण असेल याची कल्पना नव्हती.
सरांनी काही दृष्या बद्दल सांगितले होते की विवस्त्र व्हावे लागेल वगैरे वगैरे हे सर्व बोलतांना या माणसाच्या शब्दात आणि आवाजात देखील इतका प्रांजळ पणा होता की बस. माझे आई वडील भाऊ देखील हो म्हणाले. आई तर म्हणाली सर म्हणतील तसं कर. आपल्या समाजाची व्यथा आहे.. फार मोठं काम करताहेत सर.
आईकडून परवानगी मिळाल्यावर कोण मागे पुढे पाहणार..
आमचं कुटुंब सुदाम सरांच्या स्वभावाच्या इतके प्रेमात पडलं की काय सांगू आई, भाऊ 60 कीलो मीटर प्रवास करून सरांना डब्बा घेऊन यायचे. खास करून बोंबलाची चटणी.
या सिनेमांत माझी इतकी पळापळ होती की बस. शेकडो खाच खळगे, डोंगर दऱ्या, ओहोळ नदी नाले, जंगल झाडी …. पाच दिवस सारखी इकडून तिकडे पळतच होती मी. खूपदा पडले झडले परंतु सर्व टीम सतत सेवेला हजर असायची कुणी पाणी घेऊन तर कुणी टॉवेल घेऊन तर कुणी छत्री घेऊन.
सुदाम सर युनिट मधल्या मुलींना खूप जपायचे. सर्वात आधी जेवणाची, गाडीची व्यवस्था आमच्या साठी असायची. अगदी राहण्याची व्यवस्था देखील आमच्या साठी special असायची आणि स्वतः डायरेक्टर असून स्पॉट बॉय, सुतार काम करणाऱ्या सोबत राहायचे. स्वतः कधीही सेप्रेट रूम घेऊन राहिले नाही.
सुदाम सरांचा एकदा अचानक आमच्या सोबत शॉट आला… तेव्हा सेटवरच त्यांना कपडे बदलने भाग होते. पण नाही सर जवळच्याच झोपडीत गेले तेथे आडोशाला कपडे चेंज केले परंतू आमच्या समोर कपडे बदलले नाही. ही सभ्यता असा आदर पाहून आमच्या युनिट मधल्या सर्वच स्त्रियांना सुदाम सरांचा खूप आदर वाटायचा.
पण कामाच्या बाबतीत एकदम कडक माणूस. 18 तास न कंटाळता धावपळ, फाईट सीन्स वगैरे वगैरे सर्वच.. युनिट मधले म्हणायचे हा माणूस मिल्ट्रीतुन आलाय की काय? आम्ही सर्व घाबरूनच असायचो. कारण कामाशीच नव्हेतर सगळ्याच बाबतीत माणूस जेव्हा प्रामाणिक असतो त्या माणसाला भले भले टरकतात!
वखवखलेल्या माणसां बरोबर काम करतांना स्त्रिया देखील आपले हातचे राखूनच काम करतात. पण मी इथे शंभर टक्के समर्पण पाहिलेय अगदी सर्वांचेच.
सरांनी केव्हाही बोलावले की सर्व तयार!
बाजारात नग्न धिंड काढण्याचा सिन होता प्रचंड गर्दी जमलेली.. परंतू टीमचे लोक आमचे अंग झाकण्या साठी एकदम alert. शॉट झाला रे झाला की लागलीच शाल अंगावर यायची.
सर्व सिनेमा झाला आणि स्वतःला पडद्यावर पाहून माझं आख्ख कुटुंब धायरी मोकलून रडलं ! आणि अशा चित्रपटात काम करून जीवनाचं सार्थक झाल्या सारखं वाटलं.
कारण जातीयवादा विरुद्ध इतक्या प्रखरतेने इतक्या ताकतीने बेधडक कुणीही आवाज उठवला नाही जसा सुदाम सरांनी उतरंड चित्रपटा द्वारे उठवला.
खऱ्या अर्थाने सुदाम सर आंबेडकरी चळवळ पुढे नेताहेत. समतेची चळवळ एकतेची चळवळ.
अशा या इतिहासात नोंद होणाऱ्या चित्रपटात मला सामील करून घेतल्या बद्दल, सुदाम वाघमारे सरांचे खूप खूप आभार !
चित्रपट नक्कीच पहा न भूतो न भविष्यती असा हा चित्रपट आहे. उतरंड
लेख आवडला तर
सुदाम सरांना संपर्क करा ही विनंती.
9833777250/ 9820207028
आपली
संगीता गायकवाड
नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *