प्रवास दरम्यान चोरट्याने महिलेच्या पर्समधील रोख रकमेसह सोन्याचे दागिने केले लंपास ;पोलिसात फिर्याद

कोल्हापूर क्राइम

इचलकरंजी/प्रतिनिधी –
पुणे ते इचलकरंजी एस. टी. प्रवास दरम्यान चोरट्याने महिलेच्या पर्समधील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा 31 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सौ. सुचित्रा स्वप्निल कुडाळकर (वय 30 रा. कात्रज पुणे सध्या रा. विक्रमनगर इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सौ. सुचित्रा कुडाळकर या रविवारी दुपारी पुणे येथून इचलकरंजीकडे येत  होत्या. त्यावेळी चोरट्यांने त्यांच्याकडील सॅकमध्ये ठेवलेल्या पर्समधील 5 ग्रॅम वजनाचे 25 हजार रुपांचे सोन्याचे मंगळसूत्र, 6 हजार रुपये किंमतीचे दीड ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स व रोख 700 रुपये असा एकूण 31 हजार 700 रुपयांचा मुुद्देमाल लंपास केला.

इचलकरंजी/प्रतिनिधी –
विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त सुरु असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शोध पथकाने पोलिस रेकॉर्डवरील सराईत मोटरसायकल चोरट्यास पकडले. राजू अल्लाउद्दीन नाईकवाडे (वय 28 सध्या रा. अब्दुललाट मूळ रा. तीनबत्ती चौक इचलकरंजी) असे त्याचे नांव असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तर मोबाईल चोरी प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहर व परिसरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीची गस्त वाढविण्यात आहे. त्याच अनुषंगाने तपास सुरु असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकास जुना चंदूर रोड परिसरात राजू नाईकवाडे हा मोटरसायकलवरुन जात असताना त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदरची मोटरसायकल चोरीचे असल्याचे त्याने सांगितले. त्यासह आणखीन एक अशा 27 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तर एका मोटरसायकल चोरीचा तपास सुरु आहे. नाईकवाडे हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक ईश्‍वर ओमासे यांनी दिली.
ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर, रफिक पाथरवट, उदय पाटील, प्रशांत ओतारी, प्रकाश कांबळे, महेश पाटील, गजानन बरगाले, विजय माळवदे, अविनाश भोसले यांच्या पथकाने केली.
दरम्यान, स्टेशन रोड परिसरातून धूम स्टाईलने मोबाईल लंपास केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी नितीन बापू क्षिरसागर (वय 38) हा स्टेशन रोडवरील माणिक हार्डवेअरसमोर मोटरसायकलवर बसून मोबाईल बघत होता. त्याचवेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन पलायन केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *