पुणे पदवीधर मतदार संघांमध्ये साखर सम्राट व शिक्षण सम्राट यांचा पराभव करून विद्यार्थी, शिक्षक, कामगार व पदवीधर यांच्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या!

महाराष्ट्र

सांगली :पुणे पदवीधर मतदार संघांमध्ये साखर सम्राट व शिक्षण सम्राट यांचा पराभव करून विद्यार्थी, शिक्षक, कामगार व पदवीधर यांच्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या!आपण अनुभव घेत आहोत की, साखर सम्राट ऊसतोड कामगारांना किमान वेतन देत नाहीत,शेतकऱ्यांच्या ऊस दराला योग्य भाव देत नाहीत ,स्वतःच्या कारखान्यातील कंत्राटी कामगारांना कायम करत नाहीत,त्यांना किमान वेतनानुसार सुद्धा पगार देत नाहीत ,जे कायम कामगार आहेत त्यांना नियमाप्रमाणे वेतन व भत्ते देत नाहीत.वरील कामांमध्ये असलेल्या सर्व पदवीधरांचे शोषण हे साखर सम्राट व शिक्षण सम्राट करीत असल्यामुळे त्यांचा पराभव करावा आणि भाकपचे कॉ शंकर पुजारी यांना निवडून द्यावे असे आवाहन करीत आहोत.सांगली जिल्ह्यातील काही पुरोगामी असा प्रचार करीत आहेत की,भाजपचा पराभव करण्यासाठी एकच उमेदवार असावा पण सध्या पदवीधर मतदारसंघांमध्ये  34 उमेदवार उभे आहेत याचा अर्थच असा आहे की जे प्रगतीशील पुरोगामी उमेदवार आहेत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांच्यासाठी काही पुरोगामी काम करू इच्छित आहेत त्यांनी मागील निवडणुकीमध्ये जे स्वतःच्या पक्षांमध्ये बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपला निवडून दिलेले आहे .एवढी मोठी गोष्ट मात्र ते झाकून ठेवत आहेत. साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट यानी पदवीधरांसाठी दुसरे काही काम केलेले नाही. उलट पदवीधरांचे शोषणच केलेले आहे.इतकेच नव्हे तर भाजपला एकच पर्याय उमेदवार देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये  ज्या महाआघाडीची सत्ता आहे त्यांची नैतिक जबाबदारी होती. ज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चा समावेश आहे .त्यांनी या पदवीधर निवडणुकीबाबत इतर धर्मनिरपेक्ष वादी पक्ष, जनता दल,भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरविण्याबाबत बैठकीही घेतली नाही. वरील पक्षाना विश्वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक तर्फी स्वतःचां उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे भाजप विरुद्ध पराभव करण्याची त्यांची इच्छा खरोखरीच आहे का? असा प्रश्न तयार होतो .त्याचबरोबर म्हणूनच भाजपला पराभव करण्यासाठी एक उमेदवार देण्याची जबाबदारी या आघाडीने नाकारलेली आहे त्याच्याविरुद्ध मात्र हे पुरोगामी काहीही बोलत नाहीत . त्याऐवजी धर्मनिरपेक्ष जनता दल व भारतीय कम्युनिस्ट पक्ष उमेदवार राहिल्यामुळे भाजपचा पराभव होणार आहे असे सांगत फिरत आहेत.अर्थात पुरोगामी नावाचा कुठलाच राजकीय पक्ष नाही जे पक्ष आहेत ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी कामगार पक्ष ,वंचीत आघाडी व धर्मनिरपेक्ष जनता दल , रिपब्लिकन पक्ष या प्रमुख पक्ष शिवाय इतरही पक्ष आहेत तरी याबाबत जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे तथाकथित पुरोगामी सध्या करित आहेत. त्यांच्यापासून सुजान व सुशिक्षित पदवीधर मतदारानी  सावध राहून भाजप आणि संधीसाधू उमेदवारांचा पराभव करावा.असे आवाहन करणारे पत्रक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉ शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *