शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथील ‘सीएचबी’ भरती तत्काळ स्थगित करा,

Uncategorized

शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथील ‘सीएचबी’ भरती तत्काळ स्थगित करा,

मर्जीतील शिक्षकांची निवड, अनुसूचित जाती व मागासवर्गीय उमेदवारांना डावलण्याचे षड्यंत्र, ऑनलाईन निवड प्रक्रियेला विरोध, आरक्षण राबविले जात नाही

सांगली दि. 19 : जिल्ह्यात पाऊसाने थैमान तसेच कोरोना फोफावत असताना शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथील दि.२१ ऑक्टोबर पासून होणाऱ्या ‘सीएचबी’ नेमणुका / भरती सरकारने तत्काळ स्थगित करावी नाहीतर अंतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील हुशार व पात्र उमेदवारांना या भरती पासून मुकावे लागेल. ही सीएचबी भरती आरक्षण नुसार होत आहे का कसे ? याबाबत सरकारचे धोरण काय आहे? शासनाने सीएचबी द्वारे भरती करावायचे असतील तर राज्यात एकत्रित जाहिरात द्यावी जेणेकरून तज्ञ शिक्षक मिळतील.

सदर महाविद्यालय भरती करिता शासनाची लेखी परवानगी घेतली आहे का ?. त्याच त्याच उमेदवारांची पुन्हा पुन्हा निवड, वशिलेबाजी, मर्जीतील शिक्षकांची निवड, एससी उमेदवारांना डावलण्याचे षड्यंत्र, हुकुमशाही कारभाराविरोधात कारवाईची करावी. या कॉलेज प्रशासन द्वारे उमेदवारांचे सीएचबी निवडी ऑनलाईन पद्धतीने कसे राबविण्यात येत आहे याला शासनाने मान्यता दिली आहे का .

यापूर्वीही शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे झालेल्या भरती मध्ये केवळ पुन्हा पुन्हा त्याच त्याच उमेदवारांची संधी देऊन निवडी केल्या जातात अशा तक्रारी येत आहेत. केवळ नावापुरती जाहिरात काढले जातात. तासिका तत्त्वावर शिक्षक नेमण्याची जबाबदारी प्रचार्याकडून संबंधित विभागप्रमुखांवर सोपवली जाते व यातून गैरकारभार होत आहे. अनुसूचित जाती जमातींच्या, मागासवर्गीय उमेदवारांना यातून जाणीवपूर्वक डावलेले जात असते. तसेच यामुळे अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे शोषण होत असते. तसेच मर्जीतील शिक्षकांची निवड व या नेमणूक प्रक्रियेत वशिलेबाजी, गौडबंगाल, राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा आहे. याबाबत सखोल चौकशी करावी.

आधीच मागील वर्षीच्या दोन महिन्याचा तासिका तत्वावरील शिक्षकांचा शासनाकडून थकीत आहेत? ही भरती दिवाळखोरीची उदाहरण आहे. याच्या मागचे गौडबंगाल काय आहे ? कायमस्वरूपी भरती असणारे प्राध्यापक या विद्यार्थ्यांचा सदरचा लोड सहज सांभाळू शकतात. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली संबंधित प्राध्यापक हे तसेच बसून आहेत. मात्र सुपर क्लास वन ऑफिसर म्हणून शासनाचा पगार बसून घेत आहेत.

मराठा आरक्षण करिता शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, त्याच प्रमाणे सदर भरती ही संविधानाने दिलेले मागासवर्गीय यांचे आरक्षणाची अंमलबजावणी न करता होत आहे. त्यामुळे ही सीएचबी भरती थांबवाव अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन महासचिव अमोल वेटम, गौतम भगत; आकाश कांबळे ; तौसिफ मुल्ला; अमित वेटम आदिनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचेकडे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *