हाथरस बलात्कार प्रकरणी योगी आदिनाथ यांचा राजनामा घ्या, युपीत राष्ट्रपती राजवट लागू करा : ऑल इंडिया पँथर सेना

क्राइम देश-विदेश

हाथरस बलात्कार प्रकरणी योगी आदिनाथ यांचा राजनामा घ्या, युपीत राष्ट्रपती राजवट लागू करा : ऑल इंडिया पँथर सेना

( युपीत बेटी बचाओ नाही तर बेटी मिटाव , निष्क्रिय पोलिसांवर गुन्हा दाखल करा : अमोल वेटम )

सांगली दि.२९ : उत्तरप्रदेश, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस हद्दीत १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षीय अल्पवयीन दलित मुलगी शेतात काम करत असतांना चार जातीयवादी नराधमाने तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला, अमानुषपणे मारहाण केली तिची जीभ दाताने तोडली, पाठीचा कणा मोडला तर मानेचा मणक्यावर गंभीर इजा केली आहे. पीडित युवतीने दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी झुंज देत मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.

ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कार्यकाळात दलित अत्याचार हत्याकांड वाढले आहे. हे सरकार दलितविरोधी, बहुजन बेटीविरोधी सरकार आहे. बेटी बचाओ नाही तर बेटी मिटाव हाच या सरकारचा अजेंडा राहिलेला आहे.

ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अजय कुमार बिस्त उर्फ योगी आदित्यनाथ हे जातीय मानसिकतेचे असून जातीयता हीच त्यांची ओळख आहे, त्यांच्या कार्यकाळात दलित हत्याकांड, बलात्कार, महिला अत्याचार असे हजारो घटना घडल्या आहेत त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे. या अन्याय अत्याचाराबाबत सुप्रीम कोर्ट, अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग, मानवी हक्क आयोग डोळ्याला पट्टी बांधून बसलेले आहेत.

हाथरस अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणातील निष्क्रिय जातीयवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्याना सहाआरोपी केलेच पाहिजे. जातीय दृष्टिकोणातुन दलितविरोधी, महिलाविरोधी सरकार पाडून, उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लावलीच पाहिजे. ऑल इंडिया पँथर सेना या मागण्या करीत असून बहुजन बेटी बचाओ आंदोलन उभा करीत आहे. तात्काळ दलित अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रीय कार्यकम जाहीर करावा आणि या जातीयतेच्या कोरोना विरोधात गांभीर्याने पाहावे अन्यथा देशव्यापी दलितांचा जनउठाव झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे अमोल वेटम, गौतम भगत, आकाश कांबळे, अमित वेटम, तौफिक मुल्ला, आदींनी जिल्हाधिकारी तर्फे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *