राजगृह ; तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मागणी

देश-विदेश

डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड अरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष टायगर मुव्हमेंट पुणे शहर अध्यक्ष सतिश पंचरास यांनी केली !

मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष टायगर मुव्हमेंट पुणे शहर अध्यक्ष सतिश नथु पंचरास यांनी मुख्यमंत्री मा.ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे.
आपलाच
सतिश नथु पंचरास
SRP अध्यक्ष पुणे शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *