इचलकरंजी : कोरोनामुळे आणखीन दोन वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर

इचलकरंजी येथील एका ७३ वर्षांच्या वृद्धावर कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. निदान होण्यापूर्वीच सोमवारी (दि. ६) रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले होते. मंगळवारी त्यांचा स्राव तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे जाहीर करण्यात आले; तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७५ वर्षांच्या कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला.

वर्धमान चौक परिसरातील एका वृद्धाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. या वृध्दावर येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ उडाली असून मयत वृद्धाच्या नातेवाईकांसह अंत्यसंस्काराला गेलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. यामुळे संबंधित रुग्णालयाचा बेफिकीरपणा समोर आला आहे

वर्धमान चौकातील ७३ वर्षीय वृध्दावरती कोल्हापू येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर रविवारी सायंकाळी येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या वध्दाचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटीव्ह आला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ उडाली. अंत्यसंस्कारला गेलेल्या नागरिकांसह घरातील नातेवाईकांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. यांचा स्वॅब तपासासाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे वर्धमान चौक परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *