कवठेएकंद ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

क्रीडा महाराष्ट्र

पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. चार लाख तीस हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी कवठेएकंद ( ता. तासगाव) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.तासगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दीपा हरी बापट यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यात ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत तातोबा राजमाने (वय 53, रा. तासगाव) आणि सरपंच सौ. ज्योती दीपक गुरव ( वय 30 )यांचा समावेश आहे.

17 डिसेंबर 2019 तसेच दि. 19 जून 2020 रोजी वेळोवेळी ग्रामविकासाधिकारी राजमाने व सरपंच सौ. गुरव यांनी त्यांच्या पदाचा गैरउपयोग करून स्वत:च्या फायद्या करीता ग्रामनिधीतून गटारीचे काम केले असे दाखविले.

या कामी त्यांनी कवलापूर (ता. मिरज ) येथील मजुरांची नावे दाखवून मजुरांची खोटी माहिती भरून बनावट हजेरी मस्टर तयार केले. त्यावर मजुरांचे पैसे दिले असल्याबाबत सह्या करून तो बनावट दस्ताऐवज स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता तयार केला.

त्याचा वापर करून कवठेएकंद गावातील वाढीव पाईपलाईन, रस्ता कॉक्रिटीकरण काम केले असे भासविले. तासगाव पंचायत समितीचे उपअभियंता यांच्याकडून कोणतेही मोजमाप करून न घेता व प्रत्यक्ष जागेवर काम न करता कंत्राटदार दत्तकुमार रावसाहेब माळी ( रा. मालगाव ) यांच्या नावे धनादेश क्रमांक 810 व 12040333 द्वारे प्रत्येकी रक्कम 200000/- रु. अशा एकुण 4,30,600/- रूपयांची शासनाची फसवणूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *