बिअरचा साठा करण्यासाठी कंपनीतील टँकमध्ये 12 वर्ष मुतत होता बिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याचा खुलासा

क्रीडा महाराष्ट्र

बिअर बनवणाऱ्या एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. वॉल्टर पॉवेल (बदललेले नाव) याने बिअरचा साठा करण्यासाठी कंपनीतील टँकमध्ये 12 वर्ष मी मुतत होतो असं सांगितलं आहे. बिअर बॉटलमध्ये भरली जाण्यापूर्वी आपण टँकमध्ये मुतायचो असे वॉल्टरने सांगितले आहे.

‘हंस इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय की वॉल्टर हा पोर्ट कॉलिन्स शहरातील बिअरची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात कामाला आहे.

तिथून पुरवठा केल्या जाणाऱ्या जवळपास सगळ्या बिअरमध्ये त्याच्या मूत्राचे अंश मिसळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बातमीमध्ये वॉल्टरचे म्हणणेही छापण्यात आले आहे. वॉल्टरने म्हटलंय की ‘मी जेव्हा मित्रांसोबत असतो आणि मित्र ‘ही’ बिअर पिण्यासाठी मागवतात, तेव्हा मी लाजतो आणि ते काय पिणार आहे हा विचार करून त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो ‘

वॉल्टरने म्हटलंय की नोकरीमध्ये वरिष्ठांचा विश्वास संपादन केल्यानंतर आणि नोकरीला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याने पहिल्यांदा टँकमध्ये शू केली. असं का केलं विचारलं असता त्याने सांगितलं की मी खूप आळशी असून टॉयलेट खूप लांब होतं. यामुळे मी टँकमध्येच मुतायचं ठरवलं होतं. मी यापुढे टंकमध्ये मुतणार नसून तुम्हाला आता बडवायजर बिअरची खरी चव ताखायला मिळेल असं वॉल्टरने हसत हसत म्हटल्याचं हंस इंडियाने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *