इचलकरंजीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव, बाधीत नवे तीन रूग्ण

आरोग्य कोल्हापूर

इचलकरंजी कृष्णा नगर भागातील तीन नव्या रुग्णाचा अहवाल रात्री पॉजिटीव्ह आला .तीन ही रुग्ण एकाच घरातील असून त्यात अठ्ठावीस वर्षांची आई आठ वर्षाची मुलगी व 26 वर्षाची एक नातेवाईक आहे सध्या ते शहराबाहेरील एका शाळेमध्ये इन्स्टिट्यूट क्कारंन्टाईन होते

सायंकाळी कोल्हापूर येथे 23 आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये इचलकरंजी येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला रात्री मोठा झटका बसला आहे. गेले अनेक दिवस कोरोना पासून दूर राहिलेल्या या शहरात आता आणखीन तीन रुग्ण वाढले आहेत.यापूर्वी शहरात एकूण तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले असून त्यातील दोन रुग्ण उपचार होऊन बाहेर आले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे .गेले अनेक दिवस हे शहर चिंतामुक्त होते मात्र रात्री आलेल्या रिपोर्ट मुळे शहराला आता चिंता लागली आहे.

कर्नाटकातून परतलेल्या औरवाड (ता. शिरोळ) येथील एका 12 वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला घरीच क्‍वारंटाईन करण्यात आले होते. मात्र तिचा अहवाल आल्यानंतर तिला कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आज दिवसभरात रुग्णांची संख्या 33 तर एकूण जिल्ह्यात 261 रुग्ण पॉजिटीव्ह झाले आहेत. हे सर्व रुग्न विलगीकरण कक्षात असल्यामुळे संसर्गाचा धोका कमी आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *