पूण्याहुन आंदोलनासाठी आलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाबतीत सोशल मिडीया वर व्हायरल झालेली पोस्ट

कोल्हापूर

जिल्हाधिकारी साहेब गुन्हा दाखल करा

आमच्या घरातील मी , बायको, मुलगा मुबंई हुन आलो..आम्हाला परवानगी घ्यायला व वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन यायला पंधरा दिवस गेले.. कोल्हापूरात येताना चार ठिकाणी तपासणी केली.. शेवटी सीपीआर मध्ये (कोविड 19) तपासणी करून स्वब दिला… रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी पंधरा दिवस विलगीकरण केंद्रात (कॉरंटाईन) ठेवलं… कारण मुंबई ,पुणे नाशिक सह परजिल्हातील रेडझोन मधून येणाऱ्या नागरिकांना नियम लागू केला… ठीक आहे आम्ही सरकार सांगेल तस आम्ही आज पर्यंत राहिलो…

आज पर्यत पंतप्रधान मोदी जी, मुख्यमंत्री ठाकरेजी याच्या सह सर्वांचे आज पर्यंत ऐकलं इथून पुढे ही ऐकू…

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब उत्तर द्या —-
मात्र एक खेदजनक बाब म्हणजे… चार दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरात आले.. ते पण पुण्यातून… इतर जिल्हात जाण्यासाठी परवानगी घेतली होती का?

चंद्रकांत पाटील यांची तपासणी कुठे झालं? सीपीआर मध्ये स्वब घेतला का? घेतला असेल तर रिपोर्ट येई पर्यंत कुठे कॉरंटाईन केलं? रिपोर्ट काय आला ? कोरोना हा काही विशिष्ट वर्गाला होत नाही यामध्ये सर्वाना संसर्ग होऊ शकतो हे माहिती असून सर्वांना एक नियम पाहिजे… त्या नियमाचे पालन झालं का?

चंद्रकांत पाटील हे रेडझोन मधून कोल्हापूरात आल्यानंतर किती जण संपर्कात आलेत याची तपासणी केली आहे का? (माझ्या माहिती प्रमाणे 160 जण भेटले..पत्रकार धरून)

कलेक्टरसाहेब आम्ही ज्या ठिकाणाहून कोल्हापूरात आलो ते ठिकाण परिसरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता मात्र आम्ही तूम्ही सांगितलेले नियम पाळले…. मात्र चंद्रकांत पाटील यांनी का नियम पाळला नाही हे पण आम्हला सांगा?

कोरोना संकट विरोधात कलेक्टर साहेब तुम्ही, आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा परिषद सीईओ, सिपीआर वैद्यकीय अधिकारी, सगळी चांगलं काम करता आहात मात्र आज प्रामाणिक राहून आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करावी ही विनंती….

एक कोल्हापूरकर

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी कोल्हापूर भाजपाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे शुक्रवारी एका निवेदनाद्वारे केली.

‘जिल्हाधिकारीसाहेब गुन्हा दाखल करा – एक कोल्हापूरकर’ अशा आशयाचा एक संदेश चंद्रकांत पाटलांविरोधातील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदेशामध्ये चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घेतली होती का? त्यांची तपासणी कुठे झाली? असे प्रश्न विचारून लोकांमध्ये नाहक शंका निर्माण करण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

राज्यात करोनाने थैमान घातले असताना राज्य सरकार निद्रावस्थेत आहे, अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील राज्याच्या विविध भागात जाऊन आढावा घेत असून रुग्णांची चौकशी करीत आहेत. त्यांचे काम विरोधकांच्या पचनी न पडल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्या लोकांना त्वरीत शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्यावतीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *