राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. रामानंद यांची नियुक्ती

आरोग्य कोल्हापूर

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी जळगावला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी डॉ. रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ३३ नवे कोरोनाचे रूग्ण सापडले असून एकूण संख्या २६१ वर गेली आहे.

डॉ. गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे.

तर डॉ. रामानंद सध्या भाउूसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे औषधशास्त्र विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधीही कोल्हापूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले होते.

डॉ. गजभिये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांच्यातील मतभेदांची जिल्ह्यातील मंत्र्यांनाही कल्पना होती. या दोघांमधील वादाचा फटका सध्या कोरोनाच्या संकटावेळीही बसत होता.

अशातच डॉ. गजभिये यांच्या कामाच्या पध्दतीबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी होत्या. त्यातूनच ही बदली झाल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी हे आदेश काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *