मानव वेल्फेअर सोशल फौंडेशनचे समाजकार्य प्रेरणादायी ,सेवाभावी संस्थांमुळे समाजातील उपेक्षित घटकाना आधार मिळतो- डॉ.संदीप पाटील

कोल्हापूर

मानव वेल्फेअर सोशल फौंडेशनचे समाजकार्य प्रेरणादायी आसून अशा सेवाभावी संस्थांमुळे समाजातील उपेक्षित घटकाना आधार मिळत आसलेचे गौरव उदगार डॉ.संदीप पाटील यानी काढले.ते मानव वेल्फेअर सोशल फौंडेशन या संस्थेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते..या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गिरी होते
कार्यक्रमाचे नियोजन सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडले.यावेळी डॉ. संदीप पाटील यांचे हस्ते संस्थेच्या नाम फलकाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी वाद्य व संगित क्षेत्रातील स्थानिक कलावंताना संंस्थेतर्फे धान्य किट देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे समाजातील उपेक्षित घटकांसाठी संस्थेने काम करायला सुरुवात केली आहे.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अक्षय तिठे व संस्थेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख योगेश कागले यानी आपला वाढदिवसावर होणारा खर्च रद्द करुन त्या पैशातून खरेदी केलेले धान्य मानव सोशल फौंडेशन कडे गरजूना वाटण्यासाठी देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहूण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर यानी सॕनेटायझर व कोव्हिड ९5 मास्क देऊन करण्यात आले.तर प्रास्तविक मध्ये संस्थेचे सचिव विराज सोंसूरकर यानी संंस्थेच्या कार्याची व धेय्य धोरणाची माहीती दिली..
यावेळी सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन गरजू ४० कलावंताना धान्य किट वाटप करण्यात आले…शेवटी उपाध्यक्ष अक्षय तिठे यानी आभार मानले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल कोली.स्वागत कांडेकरी,अजिंक्य देसाई योगेश कागले आदीनी मोलाची साथ दाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *